cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > 'गडकरी'मधून उलगडणार नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास
Entertainment

'गडकरी'मधून उलगडणार नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास

CliQ INDIA
Last updated: October 17, 2023 11:06 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.

अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्या या कारकिर्दीतील चढ उतार ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यांचे राजकीय आणि खासगी आयुष्य या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ असे मानणाऱ्या ‘गडकरी’ यांचा असामान्य प्रवास २७ ॲाक्टोबरपासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

या चित्रपटाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे की, नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिजीत मजुमदार, दिग्दर्शक अनुराग भुसारी, अक्षय देशमुख आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नितीनजींचे आयुष्य आपल्या समोर आणले आहे. त्यामुळे त्यांच्या टीमला आणि कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो. एक सुंदर चित्रपट तुम्ही तयार केला. याचा ट्रेलर बघून आमच्या सगळ्यांच्याच मनात हा चित्रपट पाहाण्याची उत्कंठा आहे. नितीनजींच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे हे तीन तासांमध्ये बांधणे कठीण आहे. नितीन गडकरी एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आयुष्य एका भागात दाखवणे शक्य नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की याचा दुसरा भागही लवकरच प्रदर्शित व्हावा.”

भारतीय क्रिकेटर उमेश यादव म्हणाले, ” नितीन गडकरी यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. नागपूरमध्ये ज्यावेळी हायवे झाले, त्यावेळी क्रिकेटर एम एस धोनीनेही त्यांच्या या कल्पनेचे स्वागत केले. भारताला विकासाच्या दिशने नेण्याचे काम नितीन गडकरी यांनी केले आहे. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट व्हावा, ही खूप आनंदाची बाब आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट पाहावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचला पाहिजे. जेणे करून तरुणाईला एक आदर्श समाजसेवक, नेता काय असतो, याची ओळख होईल.”

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग राजन भुसारी म्हणतात, ‘’ दूरदृष्टीचा विचार करून सदैव कार्यरत असणाऱ्या नितीन गडकरी यांचे देशकार्य, समाजकार्य आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यांची व्यावसायिक कारकिर्द जितकी कौतुकास्पद आहे तितकेच रंजक त्यांचे वैयक्तिक आयुष्यही आहे. नितीन गडकरी आपल्या देशाला प्रगतीपथावर नेत असतानाच त्यांच्या पत्नीने म्हणजेच कांचनताईंनी त्यांच्या घराचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळला. त्यांच्या या यशात कांचनताईंचीही तितकीच मोलाची साथ आहे. गडकरी यांचे मित्रही तितकेच त्यांच्या या यशासाठी कारणीभूत आहेत. नितीन गडकरी यांचा सामान्य मुलगा ते यशस्वी राजकारणी हा प्रवास ‘गडकरी’मध्ये दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांना या निमित्ताने नितीन जयराम गडकरी यांना जवळून जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांनी अवश्य पाहावा.’’

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

भालचंद्र नेमाडे लिखित कादंबरी 'कोसला' आता झळकणार पडद्यावर
अप्पीच्या डोहाळे जेवणात येणार विघ्न !
व्यवसायिक रंगभूमीची दारं माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली – पुरूषोत्तम बेर्डे
'लेडी डॉन आणि पापा की परीचं' गावरान धुमशान 'जाऊ बाई गावात' ह्या नव्या कार्यक्रमात !
धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्या हेमा मालिनी; लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गोंदियात बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक
Next Article जम्मू-काश्मीर : परदेशी पर्यटकांच्या संख्येत 8 टक्के वाढ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?