मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.)। सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या आवडता कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा द्वारे नेहमीच नवनवीन गोष्टी ज्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात त्या करू पाहते. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी हास्यवीर देखील आपल्या मेहनतीतून ते देतात. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला नागपूरकरांची तुफान उपस्थिती लाभली. नागपूरकरांच्या विशेष उपस्थितीने हा कार्यक्रम विशेष रंगला आणि हाच धमाल कार्यक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील प्रेक्षकांना त्यांच्या घरबसल्या अनुभवता येणार आहे. हा विशेष भाग येत्या शनिवारी २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती होती. या विशेष भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लाडके कलाकार – समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, ओंकार राऊत, आणि प्रभाकर मोरे यांच्यासह इतर विनोदवीर त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रहसने सादर करतील. नागपूरच्या मंचावर सादर झालेले हे खास स्किटस् आणि कलाकारांची विनोदी जुगलबंदी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावेल, यात शंका नाही. कार्यक्रमाचे परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर, तसेच सूत्रसंचालक प्राजक्ता माळी यांचीही विशेष उपस्थिती या भागात पाहायला मिळाली.
या कार्यक्रम दरम्यान नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम नेहमी पाहतो आणि कार्यक्रम मला फार आवडतो आणि मी दिल्ली आणि मुंबई दोन्हीकडे हा कार्यक्रम आवर्जून पाहतो. कारण या कार्यक्रमातून विनोदाचा आनंद मिळतो आणि कार्यक्रम पाहून मानूस टेन्शन फ्री देखील होतो.
या कार्यक्रमात विशेषतः प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकर यांची जोडी मंचावर अवतरताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सईने वऱ्हाडी भाषेत बोलायला सुरुवात करत नागपूरकरांचे मन जिंकले. सई आणि प्रेक्षकांचे वऱ्हाडी भाषेतील संभाषण नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. तसेच प्रसाद ओक यांनी श्री. नितीन गडकरी सोबत गप्पा मारल्या. ३ तासाच्या या कार्यक्रमात नवनवीन प्रहसने प्रेक्षकांना या पाहता येणार आहे. त्यासोबतच विविध गाणी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असणार आहेत.
पाहायला विसरू नका महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची कारंजी फुलवणारा सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ २९ नोव्हेंबर संद्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
