सोलापूर, 16 डिसेंबर, ( हिं.स) – आईवडिलांचे भांडण, हलाखीची आर्थिक स्थिती, अभ्यासाचा ताण व वाढत्या अपेक्षेतून पालकांचे रागावणे यामुळे सोलापूर शहरातून ११ महिन्यांत ८१ अल्पवयीन मुला – मुलींनी घर सोडले. गतवर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी कमी असली तरी गेल्या तीन वर्षांत मुलांच्या बेपत्ता होणे अथवा घर सोडण्याचे प्रकार वाढले आहेत.
तथापि, घर सोडून निघून जाण्याच्या मुला-मुलींच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी त्यांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. नोकरी किंवा गरिबीमुळे कामातील व्यस्ततेमुळे पालक किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद साधू शकत नाहीत.त्यांच्या भावभावना जाणून घेऊन संवाद साधायला जवळचे कोणी नसल्याने मुले मोबाइलकडे वळत आहेत. त्याचा वाढता वापर मुलांच्या असुरक्षिततेचे कारण ठरत आहे. तसेच प्रेमसंबंध व कामासाठी सोशल मीडियातील मैत्रीतूनही मुला- मुलींचे घर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे.
हिंदुस्थान समाचार
