सोलापूर, 16 फेब्रुवारी (हिं.स.)।राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरात मोठी कारवाई करत बनावट विदेशी दारूचे लेबल तयार करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन वाहने आणि १५,८५०० बनावट लेबलांसह एकूण १३,१६,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोलापूरच्या मुस्लिम पाच्छा पेठ भागात सापळा रचण्यात आला होता. यावेळी एका रिक्षातून (MH-13-CT-0370) रॉयल स्टॅग, इम्पेरिअल ब्लू, रॉयल चॅलेंज आणि मॅकडोवेल नं. १ यांसारख्या नामवंत ब्रँड्सचे तब्बल १,५७,५०० बनावट लेबल वाहतूक करताना मिळून आले.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
