नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.) सार्वजनिक ठिकाणी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्याकडून ७९ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत भूषण सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, संशयित रमेश नारायण खोडे (रा. वडाळा गाव), भाऊराव बाळू बत्तिसे (रा. वडाळा), नवनाथ अर्जुन मोरे (रा. वडाळा), असलम फरीन शेख (रा. सादिकनगर), नाविद हैदर पठाण (रा. वडाळा, नाशिक), अझरुद्दीन शेख नईमुद्दीन (रा. म्हाडा वसाहत), मोईन शेख युसूफ शेख (रा. भारतनगर), रिजवान शेख फत्तेमोहंमद (रा. गणेशनगर), नवाज शेख फकीर मोहंमद (रा. गुलशननगर), पीयूष बंडू सावंत (रा. राजीवनगर), इम्रान नबाब शाह (रा. सादिकनगर) व इम्रान सलिम शहा (रा. भारतनगर) हे सर्व जण २५ ऑक्टोबर रोजी वडाळा गावातील मरीमाता मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत झाडाच्या आडोशाला सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या फायद्यासाठी पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले. यावेळी इंदिरानगर पोलिसांनी या सर्वांवर कारवाई करून मोबाईल फोन व चार मोटारसायकली असा ७९ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १२ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
