नाशिक, ०७ नोव्हेंबर (हिं.स.) : लग्नाचे आमिष दाखवून उच्चशिक्षित तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा तीन वेळा गर्भपात करणाऱ्या विवाहित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित तरुणी ही मूळची मनमाड येथील असून, ती नोकरीनिमित्त नाशिक येथील पाथर्डी फाटा परिसरात राहते. दरम्यान, ती जून 2021 ते जून 2023 या कालावधीत भाडेतत्त्वावर राहत असे. यादरम्यान पीडितेची आरोपी संदीप सुधाकर दिघे (वय 38, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी येथे एका जिममध्ये ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर चांगल्या मैत्रीत झाले. आरोपी हा विवाहित असला, तरी तो या पीडितेला बाहेरच्या कामांमध्ये मदत करीत असे. या निमित्ताने तो जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. कोरोनाच्या काळात पीडितेला दवाखान्यात नेण्याचे व उपचार करण्यासाठी आरोपी संदीप दिघे याने प्रयत्न केले.
यादरम्यान त्यांच्यात मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाले. त्यानंतर आरोपी संदीप दिघे याने पीडितेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून “माझ्या पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करीन,” असे सांगितले; मात्र ही बाब आरोपीने त्याच्या घरी कोणालाहीसांगितली नाही. दोघांचीही ओळख झाल्यानंतर पीडितेचे आरोपीच्या घरी जाणे-येणे होते. संदीप दिघे याची पत्नी, आई, भाऊ, वहिनी हे सर्व जण पीडितेला त्याची चांगली मैत्रीण म्हणून मानायचे. त्यादरम्यान पीडितेने संदीप दिघेच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाबाबत सांगायचा प्रयत्न केला; मात्र दिघे हा तिला जिवाचे काही बरेवाईट करण्याची धमकी देऊन वेळ मारून नेत
असे. त्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये संबंध निर्माण झाले.त्यादरम्यान जानेवारी 2022 मध्ये पीडिता ही गर्भवती असल्याचे समजले. त्यावेळेस पीडितेने आरोपीला लग्नाबाबत विचारले.असता घरच्यांना विश्वासात घेऊन आपण सर्व घरच्यांना सांगू,असे म्हणाला. त्यानंतर पीडितेला काही तरी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. याप्रकरणी इदीरानगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
