नागपूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : दसऱ्याच्या दिवशी झालेल्या दोन खूनांनी नागपूर शहर हादरले. यापैकी पहिली हत्या मोमीनपुरा परिसरात झाली. याठिकाणी एकाची डोक्यात गोळी घालून तर दुसऱ्या प्रकरणात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने तिचा खून केल्याची घटना घडली.
तहसील पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मोमीनपुऱ्यात बुरखाधारी आरोपींनी अल करीम हॉटेलचे संचालक जमील यांची डोक्यात गोळी मारून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तहसील पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार घटना घडली त्यावेळी जमील हॉटेलमध्ये काऊंटरजवळच्या सोफ्यावर बसले होते. तीन बुरखाधारी हॉटेलमध्ये रूम बुक करण्याच्या बहाण्याने पोहोचले. जमील समोर येताच त्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारून ठार केले. घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ मेयो हॉस्पीटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.जमीलने तहसील पोलिस ठाण्यातंर्गत अनेक ठिकाणी मालमत्ता खरेदी केली होती. त्यावरून बरेच वाद सुरू असल्याचे समजते. या संपत्तीच्या वादातूनच जमीलची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय.
हत्येची दुसरी घटना चारित्र्यावरील संशयातून झाली. शामकिशोर गजाम याने त्याची पत्नी अनुसया उर्फ दिव्या हिचा खून केला. हे दाम्पत्य नागपुरातील ईपीएफ ऑफिस क्वॉर्टरमध्ये वास्तव्याला होते. मंगळवारी झालेल्या भंडणानंतर आरोपी शामकिशोर याने पत्नीवर लोखंडी पाईपने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. या आरोपी फरार आहे.
हिंदुस्थान समाचार
