नाशिक, २३ जानेवारी (हिं.स.) – म्हसरूळ येथील रासबिहारी जवळ एका 23 वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला आहे.
याबाबत मसूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत अवस्थेत सापडलेली ही 23 वर्षीय युवती आढळली असून तिच्या कडे तिचे आधार कार्ड पोलिसांना मिळाले आहे. आधार कार्डच्या माहितीनुसार ती नंदुरबार येथे राहत असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. या युवतीचे नाव प्रियंका वसावे वय वर्ष 23 राहणार नंदुरबार असून स्थानिक माहितीनुसार या मुलीवर बळजबरी करून बलात्कार करून तिला जीवन ठार मारले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालय नाशिक येथे पाठवला असून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच या मृतदेहाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
