नाशिक, २२ नोव्हेंबर, (हिं.स) – नाशिक रोड येथील एमडी ड्रगची विक्री करणाऱ्या सनी पगारे टोळी विरोधात नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे नाशिक मधील एका मोठ्या टोळीला मोक्याच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत दाखल असलेल्या अंमली पदार्थ पुण्यातील पुण्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत अकरा आरोपींना अटक केली होती आणि चार आरोपी यातील फरार होते. या संघटित गुन्हेगारांनी एकत्रित येऊन एमडी ड्रग ची विक्री करणारी ही टोळी असल्यामुळे ज्यावेळी नाशिक रोड येथील कारखाना समोर आला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अकरा आरोपींवर कारवाई केली होती. त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव देखील हा पाठवण्यात आला होता. त्यानुसार सनी अरुण पगारे, मनोज भरत गांगुर्डे,अर्जुन सुरेश पवार, सुमित अरुण पगारे, गणेश संजय शर्मा, अतिश उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी,गोविंद संजय साबळे, प्रथमेश संजय मानकर, मनोहर पांडुरंग काळे,वैजनाथ हावळे,उमेश वाघ ,अमोल वाघ, अक्षय गणेश नाईकवाडे, फय्याज अहमद शेख, भूषण मोरे,अर्जुन सुरेश पिवाल या आरोपींचा समावेश आहे. या सर्वांवर कारवाई केली असून फरार असलेल्या चार आरोपी देखील या कारवाईत आहे.
हिंदुस्थान समाचार
