जळगाव, 28 डिसेंबर (हिं.स.) शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस अनधिकृतपणे स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणाऱ्या दुकानदारासह त्याचे साहित्य जप्त करण्यात आले. संदीप रवींद्र दाभाडे (३७) हा स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करीत संशयितासह गॅस भरण्यासाठी लागणारी इलेक्ट्रीक मोटार, भारत गॅसचे सिलिंडर असे साहित्य जप्त केले. संशयिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. जयस्वाल तपास करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
