नांदेड, 22 जानेवारी (हिं.स.)।अर्ध्या किमतीत सोने देण्याचे आणि गुप्तधन सापडल्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ६० लाख रुपयांना घटना फसवणूक झाल्याची धक्कादायक उघडकीस आली. याप्रकरणी खेडकरवाडी (ता. लोहा) येथील सचिन खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नातेवाईक असलेल्याने महिनाभरापूर्वी सचिनला फोन करून स्वस्तात सोने मिळवायचे आहे का? माझ्या ओळखीच्या व्यक्तीला गुप्तधन सापडले अर्ध्या किमतीत देतो असे आमिष दाखवले. ओळखीचा असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. ६० लाख रुपयांच्या बदल्यात १ कोटी रुपयांचे सोने देण्याचे आश्वासन दिले. या आमिषाला भुरळ पडून वडील, मामा आणि इतर पाहुण्यांकडून मोठी रक्कम जमवली. घराच्या बांधकामस्थळी पैसे घेऊन बोलावले. आपल्या दोन मित्रांसह यांच्यासोबत ६० लाख रुपयांसह तेथे पोहोचला. यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावर बैठक घेतली. ६० लाखांच्या नोटांचे बंडल मोजून सिमेंटच्या पोत्यात भरले आणि मी सोने घेऊन रोतो असे सांगन तो पैसे घेरून पसार झाला काही वेळानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाइल बंद आढळला. दोन दिवस नातेवाइकांच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर अखेर लोहा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी लोहा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
