सोलापूर 19 डिसेंबर ( हिं.स) लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीने भर मंडपातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली. सालिया महेबुब शेख (२५, रा. ओम नम: शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
दरम्यान, राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तिला नातेवाईकांनी खाली उतरवून बेशुध्द अवस्थेत शासकीय रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. रामकृष्ण ढोके यांनी सांगितले.
या घटनेची नोंद विजापूर नाका पेालिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक वेगाने तपास करीत आहेत. या घटनेची माहिती कळताच शेख कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात गर्दी केली होती.
हिंदुस्थान समाचार
