cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > नाशकात विद्युत रोहित्र चोरणाऱ्या संशयितास ग्रामस्थांच्या मदतीने पकडले
Crime

नाशकात विद्युत रोहित्र चोरणाऱ्या संशयितास ग्रामस्थांच्या मदतीने पकडले

CliQ INDIA
Last updated: February 18, 2024 11:01 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, १७ फेब्रुवारी, : महावितरणच्या नाशिक मंडळातील त्र्यंबकेश्वर परिसरातील पहीने गावात सकाळी महावितरणच्या रोहित्राचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयितास ग्रामस्थांच्या सतर्कतेने व मदतीने पकडण्यात आले आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून गुन्हा दाखल केला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने व सहकार्याने सदर प्रकार उघडकीस आला असून अखंडित वीज पुरवण्यासाठी अशा प्रकारे जागरूक व सतर्क राहून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मागील ६ महिन्यात त्रंबकेश्वर परिसरातील महावितरणचे आठ विद्युत रोहित्र चोरीला गेले होते. विद्युत रोहित्र हे वीज पुरवठ्यातील महत्वाचे साधन असल्याने ते चोरीला गेल्यामुळे अखंडित वीज पुरवठा करण्यास महावितरणला अडथळा निर्माण होऊन यामुळे आर्थिक फटका सुद्धा बसला होता आणि ग्रामस्थांना सुद्धा अखंडितपणे वीज पुरवठा मिळण्यास अडथळा झाला होता. सदर चोरीबाबत संबंधित पोलिस स्टेशनमध्ये महावितरणकडून फिर्याद सुध्दा दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने महावितरण आणि पर्यायाने ग्रामस्थांना सुद्धा याचा त्रास होत होता.

यासंदर्भात संबधित महावितरणच्या नाशिक ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून सर्वांच्या सहकार्याने चोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास तात्काळ संबंधीत कक्ष अभियंता किंवा जनमित्र यांना माहिती द्यावी आणि तात्काळ रोहित्रकेंद्राची स्थळ पाहणी करण्यास ग्राहकांना कळविण्यात आले. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी त्रंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील विद्युत रोहित्रावरील वीज पुरवठा बंद झाल्यावर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जनमित्र व कक्ष अभियंता यांना कळविले आणि सोबतच रोहित्र केंद्राची पाहणी केली असता वीज रोहित्राचे साहित्य चोरणारी संशयित टोळी रोहित्राजवळ आढळून आली. त्यावेळी एक संशयितास ग्रामस्थांनी पकडले मात्र टोळीतील इतर दोन संशयित पसार झाले. त्याच्याकडे वीज रोहित्र व तार तोडण्याचे व चोरून नेण्याचे साहित्य यावेळी आढळून आले.

You Might Also Like

नाशिक : खंडणीखोरांकडून तरुणावर सशस्त्र हल्ला
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
जळगाव – डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याकडील लाखो रुपये लांबविले
खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकारी निलंबित
यवतमाळ नागरी सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखा, क्षेत्रीय व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चंद्रपूर मनपातर्फे शिवजयंतीची जय्यत तयारी
Next Article दंगल सीनेमातील सुहानी भटनागरचे निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?