रत्नागिरी, तालुक्यातील भडे तोरस्करवाडी येथील ५० वर्षीय चाकरमानी प्रौढाचा नदीच्या कोंडीत बुडून मृत्यू झाला.
भडे तोरस्करवाडी येथील रहिवासी बाळकृष्ण पांडुरंग तोरस्कर (५०) त्यांना दारूचे व्यसन असल्याने सोमवारी सायंकाळपासून दारू पीत होते. दुपारी १ वाजण्याच्या दरम्याने ते घरातून बाहेर पडले होते. रात्री घरी न आल्याने त्यांचा आजूबाजूला शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत. मंगळवारी सकाळी पुन्हा त्यांचा शोध घेत असता भडे तोरस्करवाडी ते पिंपळवाडी येथील कातकोंड पऱ्या येथील ल्हाव कोंड येथे कोंडीच्या बाहेर त्यांच्या चप्पल दिसून आल्याने त्यांच कोंडीत पाय घसरून पाण्यात पडले असावेत, अशी शंका शोध घेणाऱ्या ग्रामस्थांना आली. त्यांनी कोंडीत शोध घेतला असता कोंडीत त्यांचा रुतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
