नाशिक, ०५ फेब्रुवारी : नाशिक येथे बसमध्ये चढत असताना महिलेची गळ्यातील पोत चोरण्याची घटना घडली आहे कांता कैलास आरसुळे (३५ रा.पोलीस चाळ,पौडपाडा कळवा ठाणे) असे या महिलेचे नाव असून त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरसुळे या नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. परतीच्या प्रवासासाठी त्या महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. कळवा येथे जाण्यासाठी त्या कसारा नाशिक बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
