ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील एका तरूणीला ट्रेंडीग व शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल २१ लाख ७ हजार ४५६ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक महिलेवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BulletsIn
- चाळीसगाव तालुक्यातील २० वर्षीय तरूणीच्या मोबाईल क्रमांकावर साक्षी सिंग नावाच्या महिलेने संपर्क साधला.
- महिलेने तरूणीच्या टेलीग्राम आयडीवर एक लिंक पाठविली.
- लिंकद्वारे तरूणीला एका टेलीग्राम गृपमध्ये जॉईन करण्यात आले.
- त्या गृपमधून तरूणीला बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले.
- शेअर मार्केट आणि ट्रेंडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून विश्वास संपादन केला.
- ऑनलाईन पद्धतीने तरूणीकडून २१ लाख ७ हजार ४५६ रुपये स्वीकारले.
- पैसे मिळाल्यानंतर कोणताही परतावा दिला नाही.
- फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
- अज्ञात मोबाईल धारक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
- पुढील तपास पोलीस निरीक्षक एम.एम. कासार करीत आहेत.
