तुमसर तालुक्यातील खैरलांजी येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर बोगस मजूर दाखवून शासनाचे पैसे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी केली आहे.
BulletsIn
- भंडारा जिल्ह्यात सद्या रोजगार हमीची कामे सुरू आहेत.
- ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात शेतीची कामे नसल्याने शासन रोजगार हमीची कामे सुरू करते.
- खैरलांजी गावात पांदण रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.
- रोजगार सेवकांनी आपल्याच ओळखीच्या नात्यातील 11 लोकांची बोगस हजेरी लावली.
- हे नागरिक प्रत्यक्षात कामावर आले नव्हते, तरीही त्यांच्या नावांची हजेरी बुकवर नोंद होती.
- गावातील नागरिकांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.
- गावकऱ्यांनी दोषी रोजगार सेवकावर कारवाईची मागणी केली आहे.
- खंडविकास अधिकारी चौकशी सुरू असल्याचे सांगत कॅमेरा समोर बोलण्यास नकार देत आहेत.
- गावकऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांवर वेळकाढूपणा करण्याचा आरोप केला आहे.
- योग्य चौकशी करून दोषी रोजगार सेवकाला पदमुक्त करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
