भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव (कान्हा) गावात ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू असलेल्या कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी उपसरपंच व एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील अंतर्गत राजकारणामुळे उभे राहिलेल्या वादामुळे हे प्रकरण चिघळले असून, संबंधितांनी बांधकामाची तोडफोड केल्याची कबुली ग्रामपंचायत कार्यालयात दिली आहे.
BulletsIn
-
पिंपळगाव (कान्हा) येथे 15 वित्त आयोग अंतर्गत कचरा विलगीकरणाचे काम सुरू होते.
-
या कामाला उपसरपंच उमेश उपरकर आणि सदस्य विजय चोपकर यांनी विरोध केला होता.
-
त्यांनी काम सुरू असताना ते बंद पाडले आणि पुन्हा सुरू केल्यास तोडफोड करण्याची धमकी दिली.
-
सरपंच रेखा गभने व इतर सदस्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताकीद दिली.
-
विरोध कायम ठेवत रात्रीच्या सुमारास दोघांनी मिळून बांधकामाची तोडफोड केली.
-
कचरा विलगीकरण सेड जमीनदोस्त केल्याचे सकाळी मजूर व गावकऱ्यांच्या निदर्शनास आले.
-
मासिक सभेदरम्यान उपसरपंच व सदस्यांनी कबुली दिली की त्यांनीच तोडफोड केली आहे.
-
तसेच “तुम्हाला जे करायचे ते करा” असे धमकीचे वक्तव्य त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केले.
-
या प्रकारामुळे सरपंच, सचिव व इतर सदस्यांनी आंधळगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
-
भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(4) व कलम 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
