नाशिक चारित्र्यहनन करणारा व धमकी देणारा मजकूर असलेला लिफाफा नोटीस बोर्डाजवळ ठेवून महिला वकिलाचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी महिलेने म्हटले आहे, की दि. १२ मार्च रोजी दुपारी दीडच्या सुमारास महिला वकील संघाच्या कक्षात अज्ञात इसमाने महिला वकिलाच्या नावे गलिच्छ, अश्लील चारित्र्यहनन करणारा व धमकी देणारा मजकूर मुद्रित केलेला कागद एका लिफाफ्यात टाकला व तो लिफाफा वकील संघाच्या नोटीस बोर्डाजवळ ठेवून फिर्यादी महिला वकिलाच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
