सोलापूर, 5 ऑगस्ट, (हिं.स.)। शहरात २०१९, २०२०, २०२३ व २०२५ या काळात दंगा करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल चौघांना सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यातून तडिपार करण्यात आले आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून आयुक्तालयास तडीपारीचा प्रस्ताव आला होता. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी त्यानुसार गणेश नागनाथ भोसले, नारायण ऊर्फ बबलू नागनाथ भोसले (दोघेही रा. प्रियदर्शनीनगर, सोलापूर) व ईश्वर ऊर्फ रौनी भोलेनाथ चौगुले आणि सद्दाम शबीर शेख (रा. भारतनगर) या चौघांना तडीपार केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
