सोलापूर 15 नोव्हेंबर ( हिं.स) : एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे हे दहा हजारांच्या लाच प्रकरणी झिरो पोलिसांसह लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले.
पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड होऊन ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत देण्याचे ठरले होते.
हिंदुस्थान समाचार
