सोलापूर, 6 जानेवारी (हिं.स.) मध्य रेल्वेने डिसेंबरमध्ये २० कोटी ४९ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनधिकृत ट्रॅव्हल-रजिस्टरच्या उत्पन्नाची तपासणी तीव्र केली आहे. विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली.
विनातिकीट प्रवास आणि अशा इतर गैरप्रकारांमुळे होणाऱ्या महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. डिसेंबरमध्ये मुंबई विभागात ७ कोटी ३३ लाख, भुसावळ विभागात ४ कोटी ५४ लाख रुपये,नागपूर विभागात २ कोटी ९४ लाख रुपये, सोलापूर विभागात २ कोटी ५८ लाख रुपये, पुणे विभाग १ कोटी ५६ लाख रुपये, मुख्यालयात १ कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करावा असे आवाहन रेल्वेने केले आहे.
हिंदुस्थान समाचार
