cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > नाशिक – एफडीएची सिडकोमध्ये धडक, शेकडो किलो पनीर नष्ट
Crime

नाशिक – एफडीएची सिडकोमध्ये धडक, शेकडो किलो पनीर नष्ट

CliQ INDIA
Last updated: November 10, 2023 4:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, १० नोव्हेंबर, (हिं.स.) – अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने सणाच्या पार्श्वभूमी वर कारवाई सुरूच आहे. सिडको परिसरामध्ये धडक मोहीम राबवून 397 किलो पनीर हे खाण्यासाठी योग्य नसल्याने नष्ट केले आहे. या प्रकरणी दोन पेढ्यांवर धाड टाकल्याची माहिती विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

सणासुदीचे दिवसाच्या पाश्र्वभूमीवर धडक मोहिम सुरुच आहे. लागोपाठ होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जनतेस सणासुदीच्या दिवसात दर्जेदार उपलब्ध व्हावेत याचाच भाग म्हणून अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी 6.30 वाजेपासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या आधारावर दुर्गा मंदिरच्या मार्गे, त्रिमुर्ती चौक, सिडको मे विराज एंटरप्रायजेस या पेढीची तपासणी करुन तेथून पनीरमध्ये खादयतेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीरचे अन्नमुना घेवून उर्वरित सुमारे 74 किलो, किंमत सुमारे 16 हजार 280 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून जनहिताच्या दृष्टिने नष्ट करण्यात आला आहे.

तसेच अन्न औषध प्रशासनाचे पथक सकाळी 7.30 वाजेपासून कार्यालयास प्राप्त गुप्त माहितीच्या अनुषंगे साईग्राम कॉलनी, उपेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ, अंबड येथील साई एंटरप्रायजेस, या पेढीची तपासणी करून तेथून पनीरमध्ये खाद्य तेलाच्या भेसळीच्या संशयावरुन पनीरचे अन्नमुना घेवून उर्वरित सुमारे 323 किलो, किंमत रु.67 हजार830 रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात येवून नष्ट करण्यात आला आहे.

सदरचे दोन्ही पनीर हे अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांचेकडे पाठविण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायद्या अंतर्गत पुढील आवश्यक कारवाई घेण्यात येणार आहे. कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व वि.पां. धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), नि.खं. साबळे यांच्या पथकाने नासिक विभागाचे सह आयुक्त सं.भा. नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

अन्न व औषध प्रशासनातर्फे सणासुदीच्या काळात आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी दुधापासून तयार झालेली मिठाई खरेदी करतांना खरोखर त्यामध्ये दुध, खवा, मलई किंवा इतर दुग्धजन्य पदार्थापासून तयार केलेले आहेत किंवा कसे याची खात्री करुनच खरेदी करावे त्याचप्रमाणे सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुधापासूनच बनविलेली मिठाईची विक्री करावी अथवा दुधापासूनच्या न बनविलेल्या मिठाई विक्रीसाठी ठेवल्यास त्याबाबत स्पष्ट फलक दुकानात लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांस आवाहन करण्यात येते की, त्यांनी भेसळयुक्त पनीरचा वापर अन्नपदार्थ बनविणेकामी करु नये.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

रत्नागिरी पोलिसांकडून एआय आधारित अ‍ॅपच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
तपासात हलगर्जीपणा केल्याच्या संशयातून नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक
अमरावती : पळून गेलेल्या विवाहितेला पती व नातेवाईकांच्या केले स्वाधीन | Bullets-In
चंद्रपूर: लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
जळगावात अनधिकृतपणे गॅस भरून देणाऱ्यांवर कारवाई

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इफ्फीसाठी यंदा प्रतिनिधिंची विक्रमी नोंदणी अपेक्षित : एल मुरुगन
Next Article गल्फ सिनट्रॅक, इंडिया बाईक वीक मुंबई मध्ये घेऊन आले ''चाय-पकोडा राइड्स'' ची जादू
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?