नाशिक, ९ जानेवारी, (हिं.स.) – नाशिक शहरातील विविध भागांमध्ये पाच चोरींच्या घटना घडल्या असून त्यामध्ये अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील शिवाजीनगर तसेच बस स्टॅन्ड ठक्कर बाजार येथील व्यापारी संकुल दिंडोरी रोड आणि शरणपुर रोड अशा विविध भागांमध्ये पाच ठिकाणी पोलिसांनी गस्त घालत असताना देखील चोरांनी सोसायटीमधील घराच्या दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करून या पाच ठिकाणाहून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल फोन तसेच इतर किमती हवेत असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हा चोरून नेला आहे. याप्रकरणी सरकार वाडा गंगापूर पंचवटी या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
