सोलापूर, 3 ऑगस्ट (हिं.स.)
प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणार्या आरोपीस करमाळा पोलिसांनी वाहनासह जेरबंद केले. यामध्ये 3 लाख 21 हजारांचा गुटखा, तर 8 लाख किमतीचे वाहन असे एकूण 11 लाख 21 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राजेंद्र विनायक बाविसकर (वय 40, रा. देवडाई, ता. जि. संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. अन्न व औषध प्रशानाचे सहायक आयुक्त रेणुका रमेश पाटील (वय 38) यांनी करमाळा पोलिसात दिली.
पहाटे गुन्हे पेट्रोलिंग करताना एक गाडी वेगाने जात असल्याने व वाहन संशयित असल्याची खात्रीलायक माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली. त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी स्वतः व पथक तयार करून पहाटे दीड वाजता अहिल्यानगर टेंभुर्णी रस्त्यावर जातेगावकडे जाणार्या वाहनाचा (क्रमांक एम एच 20/एफ यु 7246) पाठलाग करून पकडले. तपासणी केली असता, यावेळी 2 लाख 14 हजार 500 रुपये किमतीचा हिरा पानमसाला 1650 पाकिटे, 1 लाख 7 हजार 250 रुपयांची 65 पाकिटे प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या सर्व मुद्देमालासह 8 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. तपासणी करून करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
