गोंदिया २३ डिसेंबर (हिं. स.) : गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा-खुर्दचे सरपंच आशिष हत्तीमारे यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर प्रेमलाल मेंढे याला अटक केलीय.
यासंदर्भातील माहितीनुसार गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तूमखेडा खुर्द येथील सरपंच आशिष हत्तीमारे (३५) ग्रामपंचायत मध्ये बसलेले होते. त्यावेळी आरोपी प्रेमलाल मेंढे (५५) यांनी ग्रामपंचायत बसलेल्या सरपंचांसोबत वाद घालून नंतर चाकूने हल्ला केला. दरम्यान, ग्रामपंचायत बाहेर बसलेल्या इतर सदस्यांनी लगेच सतर्कता दाखविल्यामुळे हा चाकू हल्ला टाळता आला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेमलाल मेंढेला अटक केलीय.
हिंदुस्थान समाचार
