पुणे, 6 ऑक्टोबर, (हिं.स) संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबर रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला अत्यंत गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी कुरुलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.कुरुलकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सहभागी झाला होता. कुरुलकरच्या वतीने अॅड. ऋषिकेश गानू यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील तपास भाग पूर्ण झाला असून, कुरुलकर याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कुरुलकरचे मोबाईल आणि लॅपटॉप तपास यंत्रणांनी जप्त केले आहेत. त्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचे दोन्ही पासपोर्ट तपास यंत्रणांकडे आहेत. त्यामुळे कुरुलकर देश सोडून फरार होऊ शकत नाही.
हिंदुस्थान समाचार
