cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ
Business

भारतातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचा शुभारंभ

CliQ INDIA
Last updated: March 18, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

चंद्रपूर, 17 मार्च, (हिं.स.)। देशात कोळसा गॅसिफिकेशन आणि कोळशापासून रसायने बनवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा बनवण्यासाठी न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्ल प्रायव्हेट लिमिटेड ही अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. आज न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने चंद्रपूर येथे देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड कोळका गॅसिफिकेशन आणि कार्बन कॉम्प्लेक्स उभारणीसाठी भूमिपूजन सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर येथील भद्रावती येथे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री श्री. जी. किशन रेड्डीदेखील उपस्थित होते.

सुमारे १ हजार ६५० एकर विस्तीर्ण क्षेत्रावर या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. हा प्रकल्प भारतातील कोळशावर आधारित रसायन उत्पादन क्षेत्रातील सर्वात अत्याधुनिक प्रकल्प मानला जात आहे. यात अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानासोबत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज पायाभूत सुविधा एकत्रितपणे विकसित करण्यात येत आहेत. या प्रकल्पाद्वारे देशांतर्गत उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर खत, खाणकाम, वस्त्रोद्योग आणि पॅकेजिंगसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणा-या महत्त्वाच्या रसायनांमध्ये तसेच इंधनामध्ये केले जाईल. हा प्रकल्प पूर्णपणे विकसित झाल्यानंतर वर्षागणिक ५० लाख मेट्रिक टनांहून अधिक कोळशावर प्रक्रिया केली जाईल. या सोयीसुविधांमुळे हा प्रकल्प देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक मोठा प्रकल्प ठरेल. संबंधित सरकारी संस्थांनी प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्र दिले असून, कच्च्या मालाचा नियमित पुरवठा निश्चित करण्यासाठी या प्रकल्पाला एक कोळसा खाण देण्यात आली आहे.

हा प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांत पूर्ण केला जाईल.

पहिल्या टप्प्यात अमोनिया, अमोनियम नायट्रेड आणि मोनो इथिलीन ग्लायकॉल (एमईजी) आदी उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दुस-या टप्प्यात उत्पादन श्रेणीचा विस्तार केला जाईल. यात डीएमई (डाय मिथिल इथर), युरिया, शाश्वत विमान इंधन (एसएएफ) आणि इथेनॉलचा समावेश असेल. परिणामी, औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या देशांतर्गत कच्च्या मालाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळेल. दोन्ही टप्प्यांकरिता एकूण २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल.

भारतात रसायने, खते आणि इंधन मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. परदेशातून ही उत्पादने मोठ्या प्रमाणावर येत असल्याने देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर मोठा ताण येत आहे. चंद्रपूरातील या प्रकल्पाच्या उभारणीनंतर हा ताण कमी होईल. देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या कोळशाचे रुपांतर औद्योगिक उत्पादनांमध्ये केले जाईल. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. परकीय चलनाची बचत होईल. देशाची औद्योगिक स्वावलंबन क्षमता मजबूत होईल.

या प्रकल्पाच्या भूमिपूजनच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.

ते म्हणाले “ चंद्रपूर येथे भारतातील पहिल्या हरित एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि कार्बन कॅप्चर प्रकल्पाचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा केवळ औद्योगिक प्रकल्प नसून, भारताने शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी मी न्यू इरा क्लीनकेट कंपनीच्या संपूर्ण टीमने मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या अथक परिश्रमांना शुभेच्छा देतो.”

न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष मधुसूदन अग्रवाल म्हणाले,” भारताकडे कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून इथल्या कोळसा संपत्तीचा जबाबदारीने वापर करुन देशांतर्गत औद्योगिक परिसंस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. भारतात रसायने, इंधने आणि खत मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. आम्ही अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञान आणि कार्बन कॅप्चर सुविधांच्या माध्यमातून रसायने, इंधने आणि खतांच्या निर्मातीसाठी आवश्यक घटकांचे उत्पादन करणार आहोत. हा प्रकल्प भारताच्या उत्पादन क्षेत्राला स्वावलंबी करेल. शिवाय उत्सर्जित कार्बन उत्पादन कामांसाठी पुनर्वापराच्या माध्यमातून सर्कुलर कार्बन इकॉनॉमी निर्माण करेल. हा प्रकल्प भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेला बळ देण्यास, औद्योगिक विकासाला गती देण्यास आणि अधिक स्वच्छ व शाश्वत तंत्रज्ञानाकडे होणा-या संक्रमणाला चालना देण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल.” असा आमचा विश्वास आहे.

न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे म्हणाले,”हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे देशांतर्गत अत्यावश्यक स्वरुपातील रसायने आणि इंधन उत्पादनाला चालना मिळेल. भूमिपूजन सोहळ्याद्वारे या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामांना औपचारिक सुरवात झाली असून, पुढील काही वर्षांत हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित केला जाईल. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर भारताचे आयातीमधून मिळणा-या रसायनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. विदर्भातील औद्योगिक विकास, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला महत्त्वपूर्ण चालना मिळेल.”

न्यू इरा क्लीनटेक सोल्यूशन्सची स्थापना महत्त्वकांक्षी आणि ठाम विचारसरणीतून झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कोळशाचे योग्यरित्या जबाबदारीने वापर केल्यास, अत्याधुनिक कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचे उत्पादन कार्यक्षम स्वरुपात रुपांतरित केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत होईल. देशात नवी आत्मनिर्भर औद्योगिक अर्थव्यवस्था उदयास येईल. कोळशाच्या संसाधनांचा शाश्वत, मूल्यवर्धित पद्धतीने वापर करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. यातूनच औद्योगिक विकासाला चालना देणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

कॉन्व्हेंट्री विद्यापीठ ग्रुप आणि गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ज मॅनेजमेंटमध्ये शैक्षणिक करार | BulletsIn
ब्लॉकचेन तंत्रज्ञानात उत्तराधिकारीकरणाचे अभ्यास: एक महत्वाची विश्लेषण
वनप्लसचे नॉर्ड ५ आणि नॉर्ड सीई 5 स्मार्टफोन भारतात लाँच; एआय फीचर्सने सुसज्ज | BulletsIn
गोदरेज अँड बॉयसतर्फे ४०० केव्ही जीआयएस सबस्टेशनचा आरंभ करत उर्जा क्षेत्राला बळकटी
सलमान खान च्या हस्ते इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article घरफोडी गुन्ह्यातील आरोपी ताब्यात – ६.५० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त
Next Article निर्यात केलेले सोलापुरी टॉवेल्स युद्धामुळे माघारी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?