cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ आरोग्य उपक्रम
Business

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ आरोग्य उपक्रम

CliQ INDIA
Last updated: February 6, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

मुंबई, 05 फेब्रुवारी, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) ‘गोदरेज सहयोग’ या नवीन कामगार उपक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीच्या प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठी हा एक सुनियोजित मानसिक आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम आहे.

यासंदर्भात मुंबई महानगर क्षेत्रातील सहा बांधकाम स्थळांवर सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यात मानसिक शिक्षणाच्या माध्यमातून 2,000 हून अधिक कामगारांना सहभागी करून घेण्यात आले होते. आता हा उपक्रम मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळूर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, गुजरात आणि छत्तीसगड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील 79 निवडक बांधकाम स्थळांवर सुरू केला जाईल, ज्यामुळे अंदाजे 30,000 कामगारांपर्यंत पोहोचता येईल.

या शुभारंभाबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, “आपली शहरे आणि पायाभूत सुविधा उभारणाऱ्या लाखो लोकांच्या माध्यमातून भारताचा विकास दररोज आकार घेतो आहे. राष्ट्र उभारणाऱ्यांच्या कल्याणाची काळजी घेणे ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नाही; तर ती एक सामाजिक गरज आहे. गोदरेज सहयोगच्या माध्यमातून, आम्ही श्रम प्रतिष्ठेला मान्यता देऊ इच्छितो आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करणे, हा सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिर्माणाबद्दलच्या आपल्या विचारांचा अविभाज्य भाग ठरेल याची खात्री देतो.”

भारतीय शहरांमध्ये मजबूत उपस्थिती असलेली व्यावसायिक मानसिक आरोग्य सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी 1to1 हेल्पच्या भागीदारीने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. कारण, येथे काम करणारे बरेच जण आपल्या कुटुंबापासून दूर असतात. प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून २४/७ उपलब्ध असलेल्या सेवेद्वारे, हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर आधार प्रदान करतो. कामाच्या ठिकाणी दरमहा गट चर्चासत्रे, वैयक्तिक समुपदेशन आणि समुपदेशन तसेच आपत्कालीन मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असलेली दृकश्राव्य हेल्पलाइन यांचा या उपायांमध्ये समावेश आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “आम्ही घरे बांधतो, पण ती बांधतानाच घरे बांधणाऱ्या लोकांची जबाबदारी घेणे, हे देखील आमचे काम आहे, असे मानतो. आमचे अनेक बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबांपासून आणि नेहमीच्या वातावरणापासून दूर राहतात. गोदरेज सहयोग ही त्यांच्या मनस्थितीची एक पोचपावती आहे. तसेच अशी बांधकाम स्थळे निर्माण करण्याची एक वचनबद्धता आहे, जी केवळ कार्यक्षमच नाहीत, तर माणुसकी देखील जपतात.”

प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या परिणामांवर प्रकाश टाकताना, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी म्हणाले, “घरापासून लांब राहात असल्याने बांधकाम कामगार अनेकदा योग्य यंत्रणेअभावी वेगळा आधार शोधतात. मात्र, कालांतराने यामुळे तणाव वाढू शकतो. या प्रायोगिक उपक्रमा दरम्यान, संरचित गट सत्रे आणि गुप्त समुपदेशनामुळे त्यांना विश्वास वाटतो आणि संवाद सुधारतो. यामुळे कामगारांचा देखील विश्वास बसतो आणि एखाद्याला काही त्रास होत असेल तर त्याचे वेळेवर निदान होते. 1to1 Help सोबत भागीदारी केल्यामुळे आम्हाला थेट कामाच्या ठिकाणी व्यावसायिक, वैद्यकीयदृष्ट्या माहितीपूर्ण सहाय्य प्रदान करणे शक्य होते, जिथे या सुविधेची उपलब्धता सर्वात महत्त्वाची असते.”

भारतातील अनेक अभ्यासांनी हे अधोरेखित केले आहे की, स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मोठ्या संख्येला कुटुंबापासून लांब राहिल्याने आणि योग्य यंत्रणांच्या माध्यमातून दिलासा न मिळाल्याने मानसिक घुसमट सहन करावी लागते. ही एक अशी समस्या आहे, जिच्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.

गोदरेज सहयोग हा कार्यस्थळावरील आरोग्याबाबत कंपनीच्या विचारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो शारीरिक सुरक्षेवरील पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, आणि व्यावसायिक मदतीची उपलब्धतेचा समावेश असलेल्या अधिक सर्वसमावेशक मॉडेलकडे वाटचाल करतो.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
29व्या संख्याशास्त्र परिषदेत डिजिटल उत्पादनांचे सादरीकरण
अभिनेते पंकज त्रिपाठी एसबीआय जनरल इन्शुरन्सचे ‘ब्रँड ऍम्बेसेडर’
सॅमसंगने 2एनएम एक्झिनोस 2600 चिपसेट केली जाहीर
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार कोसळला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जळगाव – जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह
Next Article जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?