cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > पॉलिकॅब इंडिया लिमिटेड – तिसऱ्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर
Business

पॉलिकॅब इंडिया लिमिटेड – तिसऱ्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

CliQ INDIA
Last updated: January 23, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 22 जानेवारी, (हिं.स.)। पॉलिकॅब इंडिया लिमिटेड (BSE: 542652, NSE: POLYCAB) ने आज 31 डिसेंबर 2025 रोजी समाप्त झालेल्या तिसऱ्या तिमाहीचे आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले.

कामगिरीवर भाष्य करताना, पॉलिकॅब इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. इंदर टी. जयसिंघानी म्हणाले,

“तिसरी तिमाही कंपनीसाठी विक्रमी ठरली असून, महसूलाने आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर गाठला आहे. वायर अँड केबल्स (W&C) व्यवसायातील मजबूत अंमलबजावणी आणि FMEG विभागातील सातत्यपूर्ण गतीमुळे ही वाढ साध्य झाली. देशांतर्गत व्यवसायाने उल्लेखनीय कामगिरी केली असून, मजबूत मागणी आणि वाढता बाजारहिस्सा याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसून येते. प्रोजेक्ट स्प्रिंग अंतर्गत असलेली काटेकोर अंमलबजावणी सातत्याने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल देत आहे. त्याचबरोबर, खासगी भांडवली गुंतवणुकीत (Private Capex) पुनरुज्जीवनाची सुरुवातीची चिन्हे दिसत असून, त्यामुळे आमच्या वाढीच्या दृष्टीकोनाबाबत अधिक आत्मविश्वास निर्माण झाला आहे.”

मुख्य ठळक बाबी (Q3 FY26)

● संचालक मंडळाचा निर्णय: नामनिर्देशन व वेतन समितीच्या शिफारशीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. भारत ए. जयसिंघानी आणि श्री. निखिल आर. जयसिंघानी यांची कार्यकारी संचालक (Executive Director) पदावरून संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (Joint Managing Director) म्हणून पुनर्नियुक्ती तत्काळ प्रभावाने मंजूर केली आहे. हा निर्णय कंपनीच्या भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहील.

● महसूल वाढ: कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 46% वाढून ₹ 76,361 दशलक्ष झाला. ही भक्कम वाढ वायर्स अँड केबल्स (W&C) व्यवसायातील मजबूत अंमलबजावणीमुळे आणि फास्ट-मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (FMEG) विभागातील निरोगी वाढीच्या गतीमुळे साध्य झाली.

● W&C विभागाची कामगिरी: या तिमाहीत W&C विभागाने 53% वार्षिक वाढ नोंदवली. देशांतर्गत बाजारात 59% वाढीसह उल्लेखनीय कामगिरी झाली असून, मजबूत मागणी आणि वस्तूंच्या किमतीतील सातत्यपूर्ण महागाई याचा याला आधार मिळाला. प्रोजेक्ट स्प्रिंग अंतर्गत उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे बाजारहिस्सा वाढत राहिला. तिमाहीत वायर्सने केबल्सपेक्षा चांगली कामगिरी केली. केबल्स विभागात संस्थात्मक विक्रीची वाढ ही चॅनल विक्रीपेक्षा अधिक राहिली. आंतरराष्ट्रीय व्यवसायात किरकोळ वार्षिक वाढ नोंदवली गेली असून, एकत्रित महसुलात त्याचा 6% वाटा आहे. मागणी टिकवून ठेवण्यासाठी वाढलेल्या कच्चा माल खर्चाचा पास-थ्रू पुढे ढकलण्याचा धोरणात्मक निर्णय, तसेच निर्यात वाटा कमी होऊन संस्थात्मक विक्री वाढल्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल मिश्रणाचा परिणाम म्हणून, QoQ आधारावर सुमारे 300 बेसिस पॉइंट्सने मार्जिन घटून 12.1% वर आले.

● FMEG विभाग: FMEG विभागाने गती कायम ठेवत या तिमाहीत 17% वार्षिक वाढ नोंदवली. वाढीचे नेतृत्व सोलर श्रेणीने केले, तर इतर उत्पादन विभागांनी उद्योगाच्या सरासरी कामगिरीच्या जवळपास कामगिरी केली. ब्रँड-बिल्डिंगसाठी अधिक गुंतवणूक असूनही, वाढता स्केल आणि उत्पादन मिश्रणातील अनुकूल बदलामुळे विभागीय नफाक्षमता स्थिर राहिली.

▪ EPC व्यवसायाने ₹4,069 दशलक्ष महसूल नोंदवला असून, यात 4% वार्षिक वाढ झाली आहे. EBIT मार्जिन 6.7% वर राहिले.

▪ EBITDA मध्ये 34% वार्षिक भक्कम वाढ नोंदवली गेली असून, एकत्रित EBITDA मार्जिन 12.7% इतके होते.

▪ PAT मध्ये 36% वार्षिक मजबूत वाढ झाली असून, PAT मार्जिन 8.3% वर राहिले.

मुख्य ठळक बाबी (9M FY26)

● कंपनीने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, नऊ महिन्यांचा महसूल प्रथमच ₹ 200 अब्जांवर पोहोचला आहे. 9M FY26 मध्ये महसूल 30% YoY वाढून ₹ 2,00,193 दशलक्ष झाला, जो 9M FY25 मध्ये ₹ 1,54,225 दशलक्ष होता.

● W&C व्यवसायाचा महसूल 9M FY25 मधील ₹ 1,29,680 दशलक्ष वरून 35% YoY वाढून ₹ 1,75,054 दशलक्ष झाला. वितरण (Distribution) आणि संस्थात्मक (Institutional) या दोन्ही व्यवसायांमध्ये मजबूत वाढ नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा एकत्रित महसुलातील वाटा 5.9% इतका राहिला.

● FMEG व्यवसाय 9M FY25 मधील ₹ 11,844 दशलक्ष वरून 9M FY26 मध्ये 16% YoY वाढून ₹ 13,775 दशलक्ष झाला.

● EPC व्यवसायात 12% YoY घट नोंदवली गेली असून, EBIT मार्जिन 11.0% राहिले.

● EBITDA 9M FY25 मधील ₹ 19,349 दशलक्ष वरून 47% YoY वाढून ₹ 28,444 दशलक्ष झाला. EBITDA मार्जिन 14.2% नोंदवले गेले.

● PAT मध्येही 47% YoY वाढ होत 9M FY25 मधील ₹ 13,112 दशलक्ष वरून ₹ 19,228 दशलक्ष वर पोहोचला. यासह नऊ महिन्यांचा आतापर्यंतचा सर्वाधिक PAT नोंदवण्यात आला. PAT मार्जिन 9.6% राहिले.

● 31 डिसेंबर 2025 रोजी कंपनीची नेट कॅश स्थिती ₹ 30.3 Bn इतकी होती, जी मागील वर्षीच्या त्याच तिमाहीत ₹ 17.1 Bn होती.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

चांदीचे दर आभाळाला भिडले – Hindusthan Samachar Marathi
राज्यातील 143 बँकांवरील निर्बंध आरबीआयने हटविले
जिओहॉटस्टार प्लॅटफॉर्मवर “तडका” नावाचा नवा सेक्शन लॉन्च
गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा
एसबीआयचे खालापूर येथे जन सुरक्षा व वित्तीय समावेशन शिबिर संपन्न

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गुप्तधनाचे आमिष दाखवून ६० लाखांचा गंडा; लोहा पोलिसांत गुन्हा
Next Article नांदेड येथे संत विष्णुदासांच्या भक्तिगीतांचा २७ रोजी महोत्सव
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?