मुंबई, 24 जुलै (हिं.स.)। भारतातील आघाडीचा इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता एथर एनर्जी ने आज जाहीर केले की, कंपनीने महाराष्ट्रात 400 हून अधिक एथर ग्रीड फास्ट चार्जिंग पॉइंट्सचा टप्पा पार केला आहे.
हा टप्पा एथर च्या त्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे – EV वापरात अडथळा ठरणारी किंमतीबाबतची अस्वस्थता कमी करणे आणि संपूर्ण राज्यभर शहरांमध्ये व प्रमुख महामार्गांवर सहज चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देणे.
सध्या एथर चे महाराष्ट्रात 64 अनुभव केंद्रे आणि 42 सेवा केंद्रे आहेत, जी 37 शहरांमध्ये कार्यरत असून ग्राहकांना विक्री आणि सेवेसाठी सोपा पर्याय देत आहेत. एथर ग्रीड फास्ट चार्जिंग नेटवर्क आता 35 शहरांपर्यंत विस्तारले असून यात मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूर यांचा समावेश आहे. हे फास्ट चार्जर्स मुंबई – पुणे, पुणे – सातारा, सातारा – कोल्हापूर, सांगली – कोल्हापूर आणि पुणे – पानशेत या महत्त्वाच्या मार्गांवर धोरणात्मकरित्या उभारण्यात आले आहेत.
एथर ग्रीड व्यतिरिक्त ग्राहकांना LECCS (Light Electric Combined Charging System) या मानकावर आधारित 220 फास्ट चार्जिंग पॉइंट्स वापरण्याची सुविधा मिळणार आहे. LECCS हे एथर ने विकसित केले असून संपूर्ण क्षेत्रासाठी खुलं करण्यात आले आहे, जेणेकरून इतर ब्रँड्सचे लाईट इलेक्ट्रिक व्हेईकल्सही एकाच नेटवर्कवर चार्ज करता येतील. एथर चे चार्जिंग पॉइंट्स गूगल मॅपवरही दिसतील, त्यामुळे LECCS कनेक्टर असलेल्या कोणत्याही स्कूटरधारकाला जवळचा चार्जिंग पॉइंट शोधणे, नेव्हिगेट करणे आणि चार्ज करणे अगदी सोपे होते. ज्यामुळे वापराचा अनुभव आणखी सुलभ आणि प्रभावी होतो.
या निमित्ताने एथर एनर्जी चे प्रमुख बिझनेस ऑफिसर, रवनीत सिंग फोकेला म्हणाले, “महाराष्ट्र ही आमच्यासाठी मजबूत बाजारपेठ राहिली आहे , आणि इथे ईव्ही वापरण्याचा वेग सातत्याने वाढताना दिसत आहे. जसे जसे अधिक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत, तसतसे चार्जिंग ही अडचण नाही, याची खात्री असणे महत्त्वाचे आहे. . अनेक संभाव्य ग्राहकांसाठी चार्जिंग ही अजूनही एक अडथळा वाटतो – आणि तेच आव्हान आम्ही सुरुवातीपासून सोडवण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. आम्ही सुरुवातीपासून असा चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभा करत आलोय, जो वाढत्या मागणीच्या गतीशी समांतर चालेल. राज्यात 400+ फास्ट चार्जर्सचा टप्पा गाठणं हे त्याच प्रयत्नाचं फलित आहे. ही खात्री देणं महत्त्वाचं आहे की, राइडरला गरज असेल तेव्हा चार्जिंग पॉइंट नेहमीच सापडेल. आम्ही आमचं रिटेल नेटवर्क विस्तारत असताना, आमचं चार्जिंग नेटवर्कही त्याच वेगाने वाढत राहील, जेणेकरून ईव्ही मालकीचा अनुभव खर्या अर्थाने सुलभ होईल.”
चार्जिंग इकोसिस्टीम वाढवण्यासाठी, एथर एनर्जीने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्यासह संपूर्ण भारतात, तसेच ईव्ही डॉक यांच्यासह महाराष्ट्रात भागीदारी करून व्यापक पातळीवर चार्जर्स बसवले आहेत. एथर ने 2018 मध्ये भारतातील पहिले इलेक्ट्रिक दुचाकींसाठीचे फास्ट चार्जिंग नेटवर्क सुरू केले होते आणि त्यानंतर आजपर्यंत भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग नेटवर्क उभारले आहे.
सध्या भारतभरात एथर ने 3300 हून अधिक एथर ग्रीड फास्ट चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत. हे चार्जर्स प्रभावी चार्जिंग देतात, ज्या अंतर्गत अनुकूल इलेक्ट्रिक दुचाकी फक्त 10 मिनिटांत 15 किमी इतकी चार्ज होतात. यामुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचतो आणि दैनंदिन प्रवास व लांब पल्ल्याचे प्रवास अधिक सुलभ होतात.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
