पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.) एक अग्रगण्य ग्राहक टेक फर्म ऊडचलो ला PVSM AVSM SM VSM, (निवृत्त) २८ वे लष्करप्रमुख जनरल (COAS) (माजी लष्करप्रमुख) जनरल (डॉ) मनोज मुकुंद नरवणे यांची त्यांच्या सल्लागार मंडळावर नियुक्ती झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. सल्लागार संघाचा एक भाग म्हणून, जनरल नरवणे हे कंपनीला मार्गदर्शन करतील, आणि त्यांच्या ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्यांशी अखंडपणे सुसंगत असलेले धोरणात्मक निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. ऊडचलो भारत सरकारचा ‘नॅशनल स्टार्ट-अप पुरस्कार’ जिंकलेली एकमेव ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी (OTA) आहे. भारतातील ७०% पेक्षा जास्त प्रवास बाजारपेठ चिनी गुंतवणूकदारांच्या नियंत्रणात आहे हे लक्षात आल्यानंतर कंपनीने सशस्त्र दलांच्या पलीकडे असलेल्या वापरकर्त्यांच्या प्रवेश करण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म अलीकडेच विस्तारला आहे.
जनरल नरवणे, २८ वे COAS म्हणून कार्यरत होते आणि भारतीय सैन्यात चार दशकांहून अधिक काळ अनुभव असलेले एक अत्यंत नावाजलेले अधिकारी आहेत. आघाडीवरून नेतृत्व करत, त्यांनी लष्कराचे उपप्रमुख आणि पूर्व आर्मी कमांडरसह इतर अनेक प्रतिष्ठेची पदे भूषवली आहेत. त्यांची धोरणात्मक विचारसरणी, नेतृत्व कौशल्ये आणि सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी असलेली वचनबद्धता यासाठी ते ओळखले जातात.
“ऊडचलो टीममध्ये जनरल नरवणे यांचे स्वागत करताना आम्हाला आमचा सन्मान झाल्यासारखे वाटत आहे, असे ऊडचलो चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवी कुमार म्हणाले. “सशस्त्र दल समुदायाच्या फायद्यासाठी आणि आता त्यापलीकडे संपूर्ण देशाची सेवा करत असताना आमच्या सेवांचा विस्तार आणि त्या उंचावण्याच्या आमच्या प्रवासात त्यांचा व्यापक अनुभव आणि प्रगल्भ कौशल्य अमूल्य ठरेल. आम्हाला खात्री आहे की सशस्त्र दलांना आणि त्यापलीकडे जात विनाअडथळा आणि किफायतशीर प्रवासाचे अनुभव देण्याचे आमचे ध्येय पुढे नेण्यात जनरल नरवणे यांचे अतुलनीय नेतृत्व एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
जनरल नरवणे म्हणाले, “विशेष करून सशस्त्र दलांसाठीच आपल्या सेवा समर्पित करणाऱ्या पर्यटन उद्योगामधील १००% भारतीय कंपनी ऊडचलो सोबत ठामपणे उभे राहण्याचा दृढनिश्चय मी केला आहे. विविध उत्पादने आणि सेवांच्या माध्यमातून, ऊडचलो व्यवस्थित आणि ठामपणे आपल्या सशस्त्र दल समुदायातील लोकांचे जीवन सुलभ करत आहे. केवळ राष्ट्रीय सीमेवरच नव्हे तर त्यापलीकडेही जात आपला पाठिंबा देत आहे, ते जिथे असतील तिथे मदत सुनिश्चित करत आहेत. ३५ लाखांहून अधिक फौजी कुटुंबांनी ऊडचलो वर विश्वास ठेवल्यामुळे आपला प्लॅटफॉर्म आता इतर वापरकर्त्यांसाठी देखील विस्तारित करून ‘देश का भरोसा’ हे प्रतीकात्मक स्थान त्यांनी तयार केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “ऊडचलोचा दृष्टीकोन सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी सुसंगत असून स्थानिक नवकल्पना आणि उद्योजकतेद्वारे ऑनलाइन पर्यटन तंत्रज्ञान उद्योगात क्रांती घडवून आणण्याची क्षमता दाखवणारा आहे. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी माझे जीवन समर्पित केल्यावर आता मला ऊडचलो सारख्या स्टार्ट-अपला पाठिंबा देऊन आपल्या राष्ट्राच्या प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची इच्छा आहे. अलीकडेच स्टार्ट-अप परिसंस्थेची पुष्टी करत तंत्रज्ञान प्रणीत भांडवली गुंतवणूक यासाठी जागतिक स्तरावर भारत चौथे राष्ट्र म्हणून उदयास आले आहे. मी सर्वांना ऊडचलो च्या सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. असे करून अप्रत्यक्षपणे, तुम्ही ऊडचलोमुळे रोजगाराच्या संधी मिळालेल्या आपल्या दिग्गजांना मदत कराल. आपण सर्वजण मिळून आपली फौजी कुटुंबे आणि आपल्या संपूर्ण देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.”
ऊडचलो आपल्या ग्राहकांना शक्य तितका सर्वोत्तम प्रवास अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीच्या अनुभवी प्रवासी तज्ञांच्या टीम मध्ये प्रामुख्याने दिग्गज आणि वीर नारी यांचा समावेश आहे. ग्राहकांना त्यांच्या सहलींचे नियोजन करण्यात आणि त्यांच्या प्रवासाचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी मदत करण्यासाठी ही टीम नेहमीच उपलब्ध असते.
हिंदुस्थान समाचार
