सोलापूर, 20 फेब्रुवारी (हिं.स.)। होम मैदानावर इलेक्ट्रो या भव्य प्रदर्शनाचा सांगता समारंभ महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने व एअरपोर्ट ऑथॉरिटी चे सहाय्यक सरव्यवस्थापक सौ. अंजनी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी इलेक्ट्रो २०२६ चे सर्वोत्कृष्ट स्टॉलचे बक्षिस बाबर एजेन्सीज च्या गोदरेज कंपनीच्या स्टॉल ला प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर सेडाचे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धुत, माजी अध्यक्ष आनंद येमुल , चेअरमन जितेंद्र राठी , उपाध्यक्ष भूषण भुतडा, सचिव हरीश कुकरेजा , खजिनदार श्री. सुयोग कालाणी, सह सचिव गिरीश मुंदडा उपस्थित होते . प्रारंभी सोलापूर इलेकट्रोनिक्स डिलर्स असो. चे अध्यक्ष डॉ. सुरजरतन धुत यांनी स्वागतपर प्रास्ताविक करताना सर्व संचालक मंडळ व इलेकट्रो समितीचे सभासदांनी घेतलेल्या परिश्रमाबद्धल आभार व्यक्त करीत ऐतिहासिक आणि विक्रम प्रस्थापित झाल्यामुळे 2026 यशस्वी झाले असे त्यांनी आवर्जून सांगितले. या यशामागे समस्त माजी अध्यक्ष, संचालक मंडळ व सभासद असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले.
इलेक्ट्रो चे चेअरमन जितेंद्र राठी आपल्या भाषणात नागरिकांनी या प्रदर्शनास दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच मुख्य प्रायोजक व्ही प्लस तर सह प्रायोजक विझी टीव्ही , लक्ष्मी ऑटोमोबाइल्स, अपार केबल्स , हाईफा इलेक्ट्रिकल्स् , शैक्षणिक भागीदार एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी , वित्तीय भागीदार बजाज फायनान्स व इव्हेंट प्रोडक्शन प्रायोजक सॅटिसफाईड मीडिया व उत्सव इव्हेंट यांचे विशेष आभार व्यक्त केले. समस्त स्टॅालधारक, सहभागी कॉलेज विद्यार्थी व सहभागी कंपन्यांचेही विशेष आभार मानले. सात दिवसांत सुमारे एक लाख तीस हजार ग्राहकांनी यंदा प्रदर्शनास भेट दिल्याचे त्यांनी आवूर्जन उल्लेख केला.श्री सुनील माने यांनी हे प्रदर्शन अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे सांगत सेडाचे सर्व पदाधिकार्यांच्या एकात्मतेचे कौतुक केले. स्मार्ट मीटर चे फायदे सांगत सर्वांनी स्मार्ट मीटर बसवून घ्यावे असे आवाहन केले.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
