cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या बैठकीसाठी वाणिज्य सचिवांची ब्राझीलला भेट
Business

भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या बैठकीसाठी वाणिज्य सचिवांची ब्राझीलला भेट

CliQ INDIA
Last updated: October 5, 2023 7:29 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या 6 व्या बैठकीसाठी 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान ब्राझीलला अधिकृत भेट दिली. भारतीय उद्योग महासंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 20 उद्योजकांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत होते. गेल्या दोन वर्षांत द्विपक्षीय व्यापारात दुपटीने वाढ होऊन तो 16 अब्ज डॉलर्सवर गेल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे .दोन्ही देशांमधील वाढते व्यावसायिक संबंध अधिक बळकट करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.

ब्राझीलच्या अधिकार्यांशी संवाद साधताना, वाणिज्य सचिवांनी भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान ब्राझीलने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आणि ब्राझीलने जी 20 अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्याला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे नमूद केले.

भारतीय शिष्टमंडळाने ब्राझील उद्योग महासंघ, साओ पाउलोच्या व्यावसायिक संघटना , साओ पाउलोचा उद्योग महासंघ आणि रिओ डी जानेरो मधील उद्योगांसह ब्राझिलच्या प्रमुख संघटनांसोबत चर्चा, व्यवसाय संबंधी बैठका घेतल्या आणि नवीन व्यापार संधींची चाचपणी केली आणि द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींना चालना देण्यासाठी वचनबद्धता प्रदर्शित केली.

भारत आणि ब्राझील दरम्यान वाढत्या व्यापारी संबंधांना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने शिष्टमंडळाने 2 ऑक्टोबर 2023 रोजी विविध व्यापार सुलभता उपक्रमांमध्ये भाग घेतला. साओ पाउलोच्या व्यवसायिक संघटनेबरोबर झालेल्या बैठकीने संभाव्य व्यापार सहकार्यांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यानंतर व्यापारी समुदायामध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी तसेच व्यापाराला चालना देण्यासाठी नवीन संधींचा शोध घेण्यासाठी ब्राझीलमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांबरोबर संवादात्मक सत्र पार पडले.

भारतात गुंतवणूक केलेल्या ब्राझीलच्या कंपन्यांसोबत 3 ऑक्टोबर रोजी सकाळी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात परदेशी गुंतवणूकदारांना पाठिंबा देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या बैठकीत नवीन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधींवरही चर्चा झाली. बर्थवाल यांनी ब्राझीलमधील आघाडीच्या MICE (मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि ब्राझीलमधील महत्वपूर्ण साओ पाउलो उद्योग महासंघाबरोबर देखील बैठक घेतली.

4 ऑक्टोबर 2023 रोजी, वाणिज्य सचिवांनी ब्राझिलिया येथे ब्राझीलच्या परराष्ट्र व्यापार सचिव तातियाना लॅसेर्डा प्राझेरेस यांच्यासमवेत भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेच्या 6 व्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. उभय देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली आणि व्यापाराला चालना देण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार केला.

बर्थवाल यांनी उभय राष्ट्रांमधील आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारी पुढे नेण्याबाबत ब्राझीलच्या विकास, उद्योग, व्यापार आणि सेवा उपमंत्री मार्सिओ एलियास रोझा यांच्याशीही व्यापक चर्चा केली.

तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक यांसह भारताच्या गतिशील आर्थिक विकासामुळे उपलब्ध झालेल्या संधींबाबत ब्राझीलचे आघाडीचे उद्योग आणि राष्ट्रीय उद्योग महासंघाच्या सदस्यांशी संवाद साधून या भेटीचा समारोप झाला. त्यांनी ब्राझीलच्या उद्योगांना भारतातील वाढत्या पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी आमंत्रित केले.

या भेटीतील चर्चा आणि संवादाने भारत-ब्राझील व्यापार संबंधांमध्ये आशादायक वाढीचे संकेत दिले आहेत. या बैठकांनी नवीन व्यापार संधींचा शोध आणि जागतिक मूल्य साखळी द्वारे द्विपक्षीय एकात्मता बळकट करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून भविष्यातील संवादांसाठी एक सकारात्मक वातावरण उपलब्ध केले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

मालदीवच्या मुद्रेत आयाती प्रलोभन: भारताशी चर्चा
एनपीसीआयने लाँच केले ‘यूपीआय हेल्प’ एआय सहाय्यक
राज्यसभा पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड
जिल्ह्यांमधून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य मंत्रालय ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर सहकार्य करणार
गोदरेज लॉक्सतर्फे डिजिटल लॉक्स बाजारपेठेतील उत्पन्नात १० टक्क्यांनी वाढ करण्याचे उद्दिष्ट

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article एसबीआयचे 'मोबाइल हँडहेल्ड डिव्हाइस'
Next Article हिंदू संस्कृती मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ व मोरया ढोल ताशा पथक कार्यरत !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?