नाशिक, 2 जुलै, (हिं.स.) – क्लाऊड व डेटा सेंटर सेवा पुरविणारी जगातील अग्रगण्य कंपनी म्हणजेच नाशिकची ईएसडीएस (ESDS)ने सार्वजनिक क्षेत्रातील मिनिरत्न कंपनी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (CEL) सोबत भागीदारी केली असून उत्तर प्रदेशमधील साहिबाबादमध्ये ग्रीन डेटा सेंटर ची उभारणी केली आहे.
भारतच्या हरित भविष्याला चालना देणाऱ्या या आधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार डॉ जितेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.याप्रसंगी बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले हे डेटा सेंटर आत्मनिर्भर भारतासाठी एक मोठे पाऊल ठरणार असून यामुळे डेटा सुरक्षेला बळकटी येईल.तसेच नागरिकांसाठी सेवा वितरण अधिक परिणामकारक ठरेल.
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन म्हणाले ,हे डेटा सेंटर 30 मेगावॅटक्षमतेसह, स्मार्टकूलिंग आणिमॉड्युलर PODs द्वारे सुसज्ज असून अनेक नवकल्पनांना चालना देईल. ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे अध्यक्ष व सीईओ पियुष सोमाणी म्हणाले नाशिक मधून सुरु झालेल्या प्रवासाचा हा पुढील टप्पा असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन अर्थकारणाला सकारात्मक चालना मिळेल हे डेटासेंटर
प्रमुख वैशिष्ट्यांसह सज्ज असेल :
उच्च घनतेच्या संगणनासाठी मॉड्युलर PODs, 30 मेगावॅटक्षमतेसह, एका मजल्यावर 200 रॅक्सपर्यंत विस्तारक्षम , स्मार्ट कूलिंग आणि परावर्तित छप्पर ,पावसाचे पाणी संकलन आणि ऊर्जा-कार्यक्षम डिझाइन , 40 Gbps फायबररिंग, मल्टी-ISP सपोर्टसह, क्लाऊड आणि DR पुनरुत्पादनासाठी ड्युअल10 Gbps लिंक
—————
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI
