cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > कोकणातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी
Business

कोकणातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी

CliQ INDIA
Last updated: November 28, 2023 12:30 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

रत्नागिरी, 27 नोव्हेंबर, (हिं. स.) : कोकणासह महाराष्ट्रातील उद्योजक आणि उत्पादकांना जागतिक पातळीवर आपला व्यवसाय पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम या संस्थेने दुबईत येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला महाबिझ संमेलन आयोजित केले आहे. त्याद्वारे ही संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जीएमबीएफच्या सदस्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम ही संस्था २००४ साली स्थापन झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मूळचे महाराष्ट्रातील आणि कोकणातील उद्योजक कार्यरत आहेत. त्यापैकी अशोक सावंत आणि दिलावर दलवाई हे संयुक्त अरब अमिरातीत राहणारे दोघे उद्योजक तसेच फोरमचे भारतातील सदस्य नितीन सस्तकार आज रत्नागिरीत आले होते. त्यांनी याविषयीची माहिती दिली. महाराष्ट्रातील आणि मूळचे कोकणातील असलेले दोघे उद्योजक असूनही आपण कोकणात प्रथमच या संस्थेचे कार्य आणत आहोत, असे सावंत आणि दलवाई या दोघांनी सांगितले. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील काही स्थानिक उद्योजक-उत्पादकांशी संवाद साधला. प्रामुख्याने कृषी उत्पन्नावर आधारित प्रक्रिया उद्योग करणारे हे उद्योजक होते. मासे, काजू, आंबा तसेच विविध स्थानिक पदार्थांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग या उद्योजकांनी चालविले आहेत. मात्र त्यांचे पुरेसे मार्केटिंग होत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. याच काजूवर प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना परदेशात मोठी मागणी असते. हापूस आंबा असे नाव घेतले तरी तेथे विक्रीसाठी गेलेला माल सहजी विकला जातो.

दर दोन वर्षांनी महाबिझचे आखाती देशांमध्ये आयोजन केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रातील सुमारे ८०० उद्योजक तेथे येतात. त्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होते. जागतिक स्तरावरील बाजारपेठ त्यांना उपलब्ध होत असते. यावर्षी कोकणातील उद्योजकांनीही त्यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. दुबई येथे होणार असलेल्या या परिषदेत कोणत्याही मालाची विक्री करता येणार नाही. मात्र भविष्यात विक्री करण्याच्या दृष्टीने संयुक्त करार केला जाऊ शकतो. मालाला थेट बाजारपेठही उपलब्ध होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. दुबईतील दोन दिवसांच्या या परिषदेचे शुल्क भारतीय चलनात सुमारे २२ हजार रुपये असून इच्छुक व्यावसायिकांनी व्यापाराचे जागतिक व्यासपीठ मिळविण्यासाठी या परिषदेत सहभागी व्हावे. त्याकरिता अशोक सावंत (971 50 4570349) किंवा दिलावर दलवाई (9971 50 7566256) यांच्याशी संपर्क साधावा.

ब्राझील आणि अन्य देशांमधून येणाऱ्या काजूपेक्षा महाराष्ट्रातील आणि त्यातही कोकणातील काजूची चव अत्यंत अप्रतिम आहे. जगभरातील इतर ठिकाणच्या काजूपेक्षा दहापट चविष्ट असलेल्या या काजूला जगभरात मागणी येऊ शकते. त्यामुळे कोकणातील स्थानिक उद्योगांचीही भरभराट होऊ शकते. त्यांना जागतिक पातळीवरील व्यासपीठ निर्माण होऊ शकते. याच उद्देशाने या उद्योजकांना रत्नागिरीत आमंत्रित केल्याची माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

महिंद्रा ट्रक्स एण्ड बसेसचा कोल्हापुरात विस्तार; अत्याधुनिक ३एस डीलरशिप केंद्राचे उद्घाटन
देशात सोन्या- चांदीचे दर घसरले
जिओने भारताचा पहिला एआय-रेडी क्लाउड-आधारित जिओपीसी केला लाँच
चांदीने गाठला ऐतिहासिक उच्चांक – Hindusthan Samachar Marathi
स्कोडा ऑक्टाव्हिया आरएस भारतात लाँच

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
Next Article खडकी ते पुणेदरम्यान स्वयंचलित सिग्नलिंगचे काम पूर्ण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?