
रायगड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) खालापूर येथे भव्य जन सुरक्षा संतृप्ती व जनजागृती शिबिराचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत व नागरी स्थानिक संस्था पातळीवर वित्तीय समावेशन योजनांचे १०० टक्के व्याप्ती साध्य करणे हे यामागील उद्दिष्ट होते. ही मोहीम वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या तीन महिन्यांच्या देशव्यापी वित्तीय समावेशन मोहिमेशी संलग्न आहे.
एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी, हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर अरविंद कुमार सिंग उपव्यवस्थापकीय संचालक एसबीआय, मंजू शर्मा मुख्य महाव्यवस्थापक, एसबीआय मुंबई मेट्रो सर्कल आणि इतर सर्कल पदाधिकारीही या प्रसंगी उपस्थित होते.
शिबिरात पुनः केवायसी सेवा व निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यायोगे खालापूर व लगतच्या लोणावळा तालुक्यातील ग्रामपंचायतींतील ग्राहकांना आपली नोंद अद्ययावत करून भारत सरकारच्या विविध योजनांतर्गत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पेमेंट्स मिळण्यास पात्र होण्यास मदत झाली.
या प्रसंगी, एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी ग्राहकांना वेळेवर पुनः केवायसी व निष्क्रिय खाती पुन्हा सक्रिय करण्याचे महत्त्व सांगितले, जेणेकरून त्यांना बँकिंग सेवा व सरकारी कल्याणकारी लाभ अखंडितपणे मिळू शकतील. बँक ग्राहकांना वित्तीय साक्षरता व डिजिटल सुरक्षिततेसाठी सक्षम करण्यासही कटिबद्ध आहे.
शिबिरात तक्रार निवारण यंत्रणा व डिजिटल फसवणुकीपासून बचाव या विषयी लघु जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टममध्ये सुरक्षित राहण्याचे ज्ञान मिळाले.
कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रदेशातील मुद्रा कर्ज लाभार्थी व अनेक स्वयंसहायता गटांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) व प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (पीएमजेजेबिवाय) अंतर्गत दाव्याच्या रकमांचे वितरण करण्यात आले. एसबीआयच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, चिलथन हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले, तसेच शांतिनगर, खोपोली येथील मराठी प्राथमिक शाळेस नूतनीकरण व रंगकामासाठी सहाय्य देण्यात आले.
या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अनेक ग्राहकांनी शिबीरा ठिकाणी आपली केवायसी अद्ययावत केली. सहभागी, स्थानिक नेते व ग्रामस्थांनी ग्रामीण व निमशहरी भागात अत्यावश्यक बँकिंग सेवा व जनजागृती घरपोच पोहोचविण्याच्या एसबीआयच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
