मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) भारतामध्ये उत्पादन क्षेत्रात घडून येत असलेल्या नवक्रांतीच्या, वृद्धीमधील क्षमतांचे लाभ गुंतवणूकदारांना घेता यावेत यासाठी, देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या फंड कंपन्यांपैकी एक, ऍक्सिस म्युच्युअल फंडने ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. ऍक्सिस म्युच्युअल फंडची ही सर्वात नवी योजना ओपन-एन्डेड इक्विटी स्कीम असून इंडिया मॅन्युफॅक्चरिंग स्कीमचे प्रतिनिधित्व करते आणि तिचा बेंचमार्क निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग टीआरआय आहे. भारतातील उत्पादन क्षेत्राचे लाभ घेण्यात गुंतवणूकदारांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली असून, येत्या वर्षांमध्ये या क्षेत्रात वृद्धी घडून येण्याची अपेक्षा आहे. एनएफओ १५ डिसेंबर २०२३ पर्यंत खुली राहील.
ऍक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ श्री. बी गोप कुमार यांनी सांगितले, मेक इन इंडिया सारखे धोरणात्मक उपक्रम आणि अनेक वेगवेगळ्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याच्या सध्याच्या अतिशय महत्वपूर्ण काळात ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करण्यात येत आहे. हा थेमॅटिक फंड, भारताच्या वाढत्या गतीचे लाभ घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे, भारताची औद्योगिक रूपरेषा पुनःपरिभाषित करण्याची क्षमता ज्यामध्ये आहे अशा क्षेत्रांवर हा फंड लक्ष केंद्रित करेल. ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडसोबत भविष्याचा स्वीकार करण्यासाठी आम्ही गुंतवणूकदारांना आमंत्रित करत आहोत, हा फंड भारताच्या उत्पादन महत्त्वाकांक्षांबरोबरीने विकसित होण्यासाठी तयार केला आहे.
‘उत्पादन’ थीम का?
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आणि शाश्वत विकासावर भर देत भारत रोमांचक भवितव्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सरकारी उपक्रम, कामगार धोरणे व कर सुधारणांमुळे भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन केंद्र बनत आहे. भारतीय अर्थव्यवस्था वस्तूंच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, त्यामुळे जागतिक आर्थिक अस्थिरतेचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. वृद्धीचा वेग वाढण्यासाठी कारणीभूत असलेल्या काही घटकांमुळे आर्थिक भावनांमध्ये सुधारणा होत आहेत, उत्पादनांसाठीच्या मागणीला आणि उच्च क्षमता वापरला चालना मिळत आहे, त्यामुळे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर सक्षम होत आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे त्रिमुखी संधी निर्माण होते:
ऍक्सिस एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्री. आशिष गुप्ता यांनी सांगितले, सरकारकडून मिळत असलेले लक्षणीय प्रोत्साहन, अनुकूल धोरण संरचना आणि याच क्षेत्रातील जागतिक कंपन्यांसाठी वाढलेली किंमत स्पर्धात्मकता यामुळे भारतात वेगाने परिवर्तन घडून येत आहे. ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सुरु करून आम्ही एक असा पोर्टफोलिओ तयार करू इच्छितो ज्यामध्ये थीमची प्रचंड वृद्धी क्षमता प्रतिबिंबित होईल, तसेच आमच्या गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्माण संधींमध्ये सक्रिय योगदान दिले जाईल, या औद्योगिक पुनरुज्जीवनात आघाडीवर राहण्यासाठी सज्ज असलेल्या कंपन्यांकडून लाभ मिळवण्यासाठी त्यांना सक्षम केले जाईल.
ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड
भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांचा फायदा करून घेण्यासाठी सज्ज असलेल्या थीम्समध्ये धोरणात्मक गुंतवणूक करण्याचे ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंडचे उद्दिष्ट आहे. भारताच्या उत्पादन क्षमतांची रुंदी आणि खोली ज्यामधून दिसून येईल असा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन हा फंड मिळवून देऊ इच्छितो. यामध्ये भांडवली वस्तूंपासून ग्राहकोपयोगी टिकाऊ उत्पादनांपर्यंत आणि कापड उद्योगक्षेत्रापासून औषध निर्मितीपर्यंत अनेक विविध उद्योगक्षेत्रांचा समावेश असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या यशोगाथेमध्ये सहभागी होण्यासाठी एक सर्वसमावेशक मार्ग उपलब्ध करवून दिला जाईल.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढील तीन विभागांमधील कंपन्यांवर हा फंड लक्ष केंद्रित करेल.
गुंतवणूक (कॅपेक्स सायकल): उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी फॅक्टरी इक्विपमेंट आणि संशोधन व विकासामध्ये गुंतवणूक करणारे उत्पादक.
वापर (वाढत्या उत्पन्नामुळे प्रीमियमायजेशन होते): देशामध्ये ग्राहकांकडून वस्तूंचा वापर करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि प्रीमियमायजेशन वाढल्याने ज्यांच्याकडे मागण्यांमध्ये वाढ झाली आहे अशी उद्योगक्षेत्रे.
निव्वळ निर्यात (इम्पोर्ट सब्स्टीट्युशनवर भर): जागतिक पुरवठा शृंखलेमध्ये भारताच्या समावेशामुळे ज्यांना फायदा होत आहे अशा कंपन्या.
या फंडमध्ये बॉटम-अप दृष्टिकोन वापरला जाईल, ज्यामध्ये मल्टी-कॅप स्टॉक सिलेक्शन धोरण असेल. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्रिय वाटप आणि गुंतवणुकीच्या ‘क्वालिटी’ शैलीचा अवलंब करण्याबरोबरीनेच, ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड भारतीय लिस्टेड बाजारपेठांमधील ज्या विभागांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यांच्यावर भर देईल.
भारताच्या उत्पादन क्षेत्रात असलेल्या आशादायक संधींचा लाभ गुंतवणूकदारांना घेता यावा यासाठी ऍक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड तयार करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार
