भंडारा ०६ ऑक्टोंबर (हिं. स.) :- भंडारा जिल्ह्यात रस्त्यांवर अनेक ट्रक धुर सोडत असल्याचे पाहायला मिळतं आहे. असा वाहनावर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कर्वाहीचा धडाका सुरू असताना सुध्दा वाहन धारक शासनाच्या नियमाना केराची टोपली दाखवत आहेत. जानेवारी 2023 पासुन तर सप्टेंबर अखेर जिल्ह्यात 166 पीयुसी नसलेल्या वाहनावर कारवाही करत 4 लाख 60 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाही केल्यानंतरही जिल्ह्यात धूर सोडत अनेक वाहणे बिन्धास्त चालविली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा वाहणांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम आखली पाहिजे.
हिंदुस्थान समाचार
