पं.बंगाल, तामिळनाडू आणि तेलंगणात कारवाई
नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने आज, गुरुवारी देशातील 3 राज्यांमध्ये छापेमारी केली. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये ही कारवाई करण्यात आली.
ईडीने पंश्चिम बंगालमधील सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानावर आणि कोलकाता आणि उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 12 ठिकाणांवर छापे टाकलेत. त्याच वेळी ईडी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील टीटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या निवासस्थानाची देखील चौकशी केली. टीटागड नगरपालिकेतील नोकरभरती घोटाळ्याप्रकरणी प्रशांत चौधरी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये आयकर छापेमारी झाली आहे. चेन्नई, तामिळनाडू येथील द्रमुक खासदार एस जगतरक्षकांच्या 40 हून अधिक परिसरांची झडती सुरू आहे. हैद्राबाद, तेलंगणात इन्कम टॅक्सने सत्ताधारी पक्षाचे बीआरएस आमदार मगंती गोपीनाथ यांच्यावर कारवाई केली आहे. आयटी विभागाचे पथक हैदराबादमधील ज्युबली हिल्स, कुकटपल्ली, गचिबावलीसह बीआरएस आमदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली.
हिंदुस्थान समाचार
