cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > चीनच्या मदतीने अमेरिकन तळांवर लक्ष ठेवून इराणचे हल्ले? गुप्त दस्तावेजांतून धक्कादायक माहिती
International

चीनच्या मदतीने अमेरिकन तळांवर लक्ष ठेवून इराणचे हल्ले? गुप्त दस्तावेजांतून धक्कादायक माहिती

CliQ INDIA
Last updated: April 16, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
चीनच्या मदतीने अमेरिकन तळांवर लक्ष ठेवून इराणचे हल्ले? गुप्त दस्तावेजांतून धक्कादायक माहिती

तेहरान, 15 एप्रिल (हिं.स.)।पश्चिम आशियातील अलीकडील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्करी क्षमतेबाबत एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अहवालानुसार, इराणने गुप्तपणे चीनकडून एक गुप्तचर उपग्रह मिळवला असून, त्याच्या मदतीने संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांवर नजर ठेवून हल्ल्यांसाठी धोरणात्मक माहिती गोळा केली.

अहवालानुसार, “टीईई-०१बी” नावाचा हा उपग्रह चीनी कंपनी “अर्थ आय को.” यांनी तयार केला असून चीनमधूनच त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. २०२४ च्या अखेरीस हा उपग्रह इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)च्या एरोस्पेस फोर्सच्या ताब्यात देण्यात आला. अहवालात लीक झालेल्या इराणी लष्करी कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, आयआरजीसीच्या कमांडरांनी या उपग्रहाला थेट निर्देश देऊन पश्चिम आशियातील प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर नजर ठेवण्याचे काम करवून घेतले. या कागदपत्रांमध्ये वेळ-नोंद असलेले कोऑर्डिनेट्स, उपग्रह प्रतिमा आणि कक्षीय विश्लेषण समाविष्ट आहे, ज्यातून ही निगराणी अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रणालीबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे दिसून येते.

माहितीनुसार, या उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा मार्च महिन्यातील असून, त्याच ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले होते. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, हल्ल्यांपूर्वी आणि नंतरच्या प्रतिमांचे विश्लेषण करून हल्ल्यांचा परिणाम किती प्रभावी होता, हेही तपासण्यात आले. मात्र, वृत्तसंस्थेला या अहवालाची स्वतंत्रपणे पुष्टी करता आलेली नाही, त्यामुळे अधिकृत पुष्टी अद्याप बाकी आहे.

अहवालानुसार, या करारांतर्गत इराणला बीजिंगस्थित उपग्रह नियंत्रण आणि डेटा सेवा देणाऱ्या “एम्पोसॅट” कंपनीच्या व्यावसायिक ग्राउंड स्टेशन्सपर्यंत प्रवेश देण्यात आला. या ग्राउंड स्टेशन्सचे जाळे आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर भागांमध्ये पसरलेले असल्याने, उपग्रह संचालन आणि डेटा प्रेषणामध्ये इराणला मोठा तांत्रिक फायदा मिळाला.या उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये सौदी अरेबियातील “प्रिन्स सुलतान एअर बेस” प्रमुख आहे. या ठिकाणाचे फोटो १३, १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात आले होते. १४ मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या एअर बेसवरील अमेरिकन विमानांना हल्ल्यात नुकसान झाल्याची पुष्टी केली होती.

याशिवाय, या उपग्रहाने जॉर्डनमधील “मुवाफ्फाक साल्टी हवाई तळ”, बहरीनची राजधानी “मनामा” जवळील अमेरिकन पाचव्या नौदल तळाच्या परिसराचे, तसेच इराकमधील “एरबिल विमानतळ” परिसराचेही निरीक्षण केले. या सर्व ठिकाणी त्या काळात इराणकडून हल्ल्यांचे दावे करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप व्हाईट हाऊस, सीआयए, पेंटागॉन, चीनचे परराष्ट्र व संरक्षण मंत्रालय, तसेच “अर्थ आय को.” आणि “एम्पोसॅट” यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

वारसा धोक्यात: ॲबोटाबादमधील ऐतिहासिक गुरुद्वाराच्या कथित लाचखोरी आणि पाडकामामुळे समाजात संताप
अणुकरारावरील चर्चा थांबल्यानंतर अमेरिका-इराणमधील तणाव वाढल्याने रुबिओ इस्रायलला भेट देणार
सौदी, इजिप्त, तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री पश्चिम आशियावर चर्चेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सुरक्षा दलांचे 86 जवान ठार; बीएलएने घेतली जबाबदारी
बांगलादेशात हिंदू भीतीच्या वातावरणात दुर्गा पूजा साजरी करत आहेत – सजीब वाजेद

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार ‘सामना’ – नवनाथ बन
Next Article “तंत्रज्ञान करुणा, सचोटीची जागा कधीच घेऊ शकत नाही” — राष्ट्रपती
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?