cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > ललित मोदींची बीसीसीआयकडे संजिव गोयंका यांच्या एलएसजीवर बंदी घालण्याची मागणी
Sports

ललित मोदींची बीसीसीआयकडे संजिव गोयंका यांच्या एलएसजीवर बंदी घालण्याची मागणी

CliQ INDIA
Last updated: April 4, 2026 6:37 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
ललित मोदींची बीसीसीआयकडे संजिव गोयंका यांच्या एलएसजीवर बंदी घालण्याची मागणी

नवी दिल्ली , 03 एप्रिल (हिं.स.)।आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ललित मोदी यांनी आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) संघाचे मालक संजिव गोयंका यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ललित मोदी यांनी गोयंका यांच्यावर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही; यापूर्वीही त्यांनी लखनौ सुपर जायंट्सच्या मालकावर नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, ललित मोदी यांना फरार घोषित करण्यात आले असून ते दीर्घकाळापासून देशाबाहेर राहत आहेत.

१ एप्रिल रोजी इकाना स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.या सामन्यानंतर संजिव गोयंका हे संघाचे कर्णधार ऋषभ पंत यांच्याशी चर्चा करताना दिसले,ज्यामध्ये ते पंत यांना काहीतरी सांगताना दिसत होते.ऋषभ पंत आणि संजिव गोयंका यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट झालेले नाही. चाहत्यांनी आणि समीक्षकांनी या घटनेची तुलना आयपीएल २०२४ मध्ये संजिव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात घडलेल्या प्रसंगाशी केली आहे.सोशल मीडियावर संजिव गोयंका यांच्याशी संबंधित मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “स्पर्धेत फक्त एकच सामना झाला आहे; याची काही गरज नव्हती.”

ललित मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “मी आधीच सांगितले होते की लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजिव गोयंका आयपीएलमध्ये संघाचे मालक होण्यास योग्य नाहीत. त्यांच्या वर्तनामुळे मला खरोखर लाज वाटते. मी आयपीएल चाहत्यांसाठी आणि खेळाडूंसाठी तयार केले होते, दरवर्षी अशा घटना घडाव्यात म्हणून नाही. जर मी अजूनही चेअरमन आणि कमिश्नर असतो, तर मी त्यांना तात्काळ बंदी घातली असती आणि संघाचे मालकी हक्क कायमचे काढून घेतले असते. गोयंका अहंकारी आहेत. याच कारणासाठी फ्रँचायझी करारामध्ये एक विशेष कलम आहे. बीसीसीआयने ते लागू करावे — प्रामाणिकपणा सर्वांत महत्त्वाचा आहे. चाहते आणि खेळाडू दोघेही हे लक्षात ठेवतील.”

दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सने एक व्हिडिओ पोस्ट करून संजिव गोयंका आणि ऋषभ पंत यांच्यात सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्टीकरण दिले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “तुम्ही जे पाहत आहात ते पूर्ण सत्य नाही. कॅमेरे बंद झाल्यानंतरचे सामन्यानंतरचे अनफिल्टर्ड क्षण येथे आहेत.”सामन्यानंतर संजिव गोयंका यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “हा मोठा हंगाम आहे आणि असे क्षण काहीतरी अर्थपूर्ण घडवण्याच्या प्रवासाचा भाग असतात. मला माझ्या कर्णधार आणि संघावर पूर्ण विश्वास आहे की ते दमदार पुनरागमन करतील. इकाना स्टेडियममध्ये दिलेल्या पाठिंब्यासाठी आमच्या चाहत्यांचे आभार. आम्ही अधिक मजबूत होऊन परत येऊ. या हंगामात लखनौची कथा अजून लिहिली गेलेली नाही.”

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

नाशिक – राष्ट्रीय बुद्धीबळ निवड स्पर्धेला दिमाखात सुरुवात
जॉय शेळके याची महाराष्ट्र फुटबॉल संघासाठी निवड | BulletsIn
नाशिक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
नेमारची शस्त्रक्रिया यशस्वी; २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी ब्राझील संघात परतण्याची आशा
लक्ष्य सेनची ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मुसंडी; एनजी का लाँग एंगसवर कडव्या झुंजीत विजय

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article संसदेचे विशेष अधिवेशन एकतर्फी असल्याचा काँग्रेसचा आरोप
Next Article नोएडा प्राधिकरण स्थापना दिन: गौतम बुद्ध नगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?