मुंबई, 09 फेब्रुवारी (हिं.स.)। वेअरेबल कंपनी Boat ने भारतीय बाजारासाठी आपली नवीन Hive Dashcam सिरीज लॉन्च केली असून, या रेंजची सुरुवातीची किंमत 2,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑडिओ आणि वेअरेबल्सपुरती मर्यादित न राहता, आता Boat ने इन-कार सेफ्टी डिव्हाइस क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. या सिरीजमध्ये F1, M1 आणि E1 असे तीन मॉडेल्स सादर करण्यात आले असून, ती खासगी कार मालक, रोज प्रवास करणारे तसेच व्यावसायिक वाहनचालकांना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहेत.
Boat Hive Dashcam सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये Sony STARVIS सेन्सरचा वापर करण्यात आला आहे, जो कमी प्रकाशात आणि जास्त झगमगाट असलेल्या ड्रायव्हिंग परिस्थितीतही स्पष्ट रेकॉर्डिंग देण्यासाठी उपयुक्त ठरतो. फ्लॅगशिप F1 (९,९९० रुपये) मॉडेलमध्ये 4K फ्रंट कॅमेरा आणि 1080p रियर कॅमेरा असून, ड्युअल-चॅनल रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये लेन डिपार्चर आणि फ्रंट कोलिजन वॉर्निंगसाठी व्हॉइस अलर्टसह अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), तसेच बिल्ट-इन GPS, व्हॉइस कंट्रोल आणि Wi-Fi अॅप कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
M1 (४,४९९ रुपये) मॉडेलमध्ये 140 अंशांचा वाइड-अँगल लेन्स असून 2K QHD रेकॉर्डिंग, GPS आधारित रूट व स्पीड ट्रॅकिंग, टक्कर ओळखण्यासाठी G-सेंसर आणि 512GB पर्यंत मायक्रोSD कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे. एंट्री-लेव्हल E1 मॉडेलमध्ये 1,296p रेकॉर्डिंग सपोर्ट असून, कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये लूप रेकॉर्डिंग आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी रेकॉर्डिंगची सुविधा देण्यात आली आहे.
या लॉन्चवर प्रतिक्रिया देताना Boat चे सीईओ गौरव नैयर म्हणाले की, ऑडिओ आणि वेअरेबल्सच्या पलीकडे जाऊन डॅशकॅम क्षेत्रात प्रवेश करणे हा आजच्या ग्राहकांसाठी स्मार्ट आणि उपयुक्त तंत्रज्ञान तयार करण्याच्या Boat च्या दृष्टिकोनाचा नैसर्गिक विस्तार आहे. भारतीय रस्ते अधिक गुंतागुंतीचे होत असताना, डॅशकॅम आता लक्झरी नसून गरज बनत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Boat Hive Dashcam सिरीजमधील F1, M1 आणि E1 (२,४९९ रुपये) मॉडेल्स Boat ची अधिकृत वेबसाइट, अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
