cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > ओमेगा सेकीची पहिली वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च
Business

ओमेगा सेकीची पहिली वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च

CliQ INDIA
Last updated: February 8, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 07 फेब्रुवारी (हिं.स.)। इलेक्ट्रिक दोपहिया वाहन निर्माता ओमेगा सेकी मोबिलिटी (ओएसएम) ने आपली पहिली वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर ओएसएम वेक्स्ट्रा भारतीय बाजारात लॉन्च केली असून यासोबतच कंपनीने पर्सनल इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. ही स्कूटर 99,900 रुपये (एक्स-शोरूम) किमतीत सादर करण्यात आली आहे. आतापर्यंत प्रामुख्याने कमर्शियल इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपनीसाठी हा एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल मानला जात आहे. ओएसएम वेक्स्ट्राच्या माध्यमातून कंपनी शहरात रोज प्रवास करणारे नागरिक तसेच किफायतशीर आणि उच्च कार्यक्षमतेचा इलेक्ट्रिक स्कूटर शोधणाऱ्या प्रोफेशनल वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहे.

या स्कूटरमध्ये 3.5-इंच रंगीत एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून तो रिअल-टाइम चार्ज स्टेटस आणि उर्वरित अंतराची माहिती दाखवतो. याशिवाय USB चार्जिंग, रिव्हर्स पार्किंग असिस्ट आणि पर्यायी जीएसएम कनेक्टिव्हिटीसारखी आधुनिक फीचर्सही उपलब्ध आहेत. ही स्कूटर 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे चार तास घेत असून, घरगुती चार्जरवर पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे पाच तास लागतात.

ओएसएम वेक्स्ट्राची टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रतितास असून ती एका चार्जवर 110 किलोमीटरपेक्षा जास्त प्रत्यक्ष वापरातील रेंज देते. त्यामुळे शहरातील दैनंदिन वापरासाठी ती एक उपयुक्त पर्याय ठरते, जिथे परफॉर्मन्स, कमी चालू खर्च आणि आधुनिक कनेक्टिव्हिटी फीचर्स यांचा संतुलित मेळ आहे. बॅटरीच्या बाबतीत या स्कूटरमध्ये 3.45 kWh क्षमतेची IP67-रेटेड LMFP बॅटरी देण्यात आली असून, त्यास 3 kW BLDC हब मोटर जोडण्यात आली आहे. ही स्कूटर 12 अंशांची ग्रेडेबिलिटी देते, त्यामुळे फ्लायओव्हर आणि शहरी चढावांवरही ती सहज चालू शकते. यामध्ये Eco, City आणि Sports असे तीन रायडिंग मोड उपलब्ध असून, राइडर्सना कार्यक्षमता आणि परफॉर्मन्स यामधून निवड करता येते.

ओएसएम वेक्स्ट्राचे उत्पादन ओमेगा सेकी मोबिलिटीच्या फरीदाबाद येथील उत्पादन केंद्रात होणार असून, या युनिटची वार्षिक उत्पादन क्षमता 25,000 स्कूटर इतकी आहे. भारताबरोबरच ही स्कूटर आफ्रिकन बाजारातही निर्यात केली जाणार आहे, ज्यामुळे कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला विस्तार वाढवण्यास मदत होईल.

कंपनी ही स्कूटर देशभरातील 200 पेक्षा अधिक डीलर नेटवर्कच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून टियर-1, टियर-2 आणि टियर-3 शहरांतील ग्राहकांपर्यंत सहज पोहोचता येईल. लॉन्चबाबत माहिती देताना ओमेगा सेकी मोबिलिटीचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. उदय नारंग यांनी सांगितले की, “ओएसएम वेक्स्ट्राच्या लॉन्चसह आम्ही फास्ट-स्पीड टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहोत, जो परफॉर्मन्स, रेंज आणि किफायतशीर किंमत यांचा समतोल साधतो.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ही स्कूटर केवळ महानगरांसाठी नव्हे, तर टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठीही तंत्रज्ञानाधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

सोन्याच्या किमतीत किंचित वाढ; चांदीही महागली
एनएसईच्या आयपीओसाठी देश-विदेशातील दिग्गज कंपन्यांची फौज
चांदीचे दर आभाळाला भिडले – Hindusthan Samachar Marathi
जानेवारीतील उच्चांकानंतर सोने-चांदी कोसळले; बाजारातील घबराट, नफावसुली आणि डॉलरच्या मागणीने बदलले चित्र.
दक्षिणेतील देशांमधील सहकार्य भविष्यातील व्यापाराचा पाया अधिक बळकट करेल – पीयूष गोयल

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून तृतीयपंथी महिलेची हत्या झाल्याचे निष्पन्न
Next Article नवी मुंबई तुर्भे येथे उभारण्यात येणार कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्प
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?