सोलापूर, 04 फेब्रुवारी (हिं.स.)। सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये १४ वर्षांखालील मुलं व मुलींसाठी व्हॉलीबॉल निवड चाचणी उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग नोंदवत कौशल्याचा दमदार परिचय दिला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. दशरथ गुरव (जिल्हाध्यक्ष, सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ) उपस्थित होते. यावेळी व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव श्री. अनिल गिराम, श्री. खंडू शिंदे, सुभाष माने, बाबूलाल इंगळगी, प्रशांत बिराजदार, पाटील तसेच संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.निवड चाचणीतून गुणवत्ता आणि फिटनेसच्या निकषांवर खेळाडूंची निवड करण्यात आली. निवडलेला संघ दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी फुरसुंगी-सासवड रोड, पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
