मुंबई, 27 जानेवारी (हिं.स.)। विवोने भारतात आपली एक्स सीरिज पुढे नेत नवीन स्मार्टफोन विवो एक्स200टी लॉन्च केला आहे. हा फोन एक्स200 आणि एक्स200प्रो यांच्या मधील मजबूत पर्याय म्हणून सादर करण्यात आला असून, रोजच्या वापरात फ्लॅगशिप दर्जाची कामगिरी, दमदार कॅमेरा आणि भरोसेमंद बॅटरी हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आला आहे. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे ZEISS सोबत को-इंजिनिअर्ड केलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
विवो एक्स200टी मध्ये 50MP ZEISS Super Telephoto कॅमेरा देण्यात आला असून, तो 3x ते 10x पर्यंत उत्कृष्ट झूम डिटेल कॅप्चर करतो. याशिवाय 50MP ZEISS मेन कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो, ज्यामुळे पोर्ट्रेट, लँडस्केप आणि दैनंदिन फोटोग्राफी अधिक प्रभावी होते. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडीओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ आणि प्रीमियम वाटतो. परफॉर्मेंससाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 9400+ चिपसेट देण्यात आला असून, तो फ्लॅगशिप लेव्हल स्पीड आणि AI क्षमता प्रदान करतो. यासोबत LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज असल्यामुळे मल्टीटास्किंग आणि हेवी अॅप्स वापरणे सोपे होते. दीर्घकाळ कामगिरी टिकवण्यासाठी मोठा लिक्विड कूलिंग वेपर चेंबरही देण्यात आला आहे.
बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 6200mAh ची मोठी बॅटरी असून ती सहजपणे संपूर्ण दिवस चालू शकते. चार्जिंगसाठी 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली आहे. हा स्मार्टफोन ओरिजिनओएस 6 वर चालतो, ज्यामध्ये ऑफिस किट, ड्रॅग अँड गो, फ्लिप कार्ड्स आणि सुधारित मल्टीटास्किंगसारखी फीचर्स मिळतात. कंपनीने या फोनसाठी 5 वर्षांचे ओएस अपडेट आणि 7 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
भारतामध्ये विवो X200T Stellar Black आणि Seaside Lilac या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये तर 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 3 फेब्रुवारीपासून विवोच्या वेबसाइटवर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
