सोलापूर, 23 जानेवारी, (हिं.स.)। सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केला.
जुलै 2024ते 22 जानेवारी 2026 या काळात मुख्याध्यापकाने वारंवार सांगूनही छळ सुरूच ठेवला. त्याच्या सततच्या त्रासाला वैगातून शिक्षकेने पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एम. डी. बिराजदार असे त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे.फिर्यादी १३ वर्षांपासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी दहा वर्षे त्या शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर काम केले आणि आता त्यांना ४० टक्के वेतन मंजूर आहे. त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील १३ वर्षांपूर्वीच नेमणूक झालेला आहे. जुलै २०२४ मध्ये त्या मुख्याध्यापकाने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लिल हावभाव करायला सुरवात केली.सहा महिन्यांपूर्वी त्याने मोबाईलवरील स्टेट्सवर पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून ‘तुम्ही खूप छान दिसता, नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका साडीवरील एकटीचा फोटो ठेवा’ अशी टिप्पणी केली. त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेने मुख्याध्यापकास वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका, असे बजावले होते.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
