नाशिक, 01 डिसेंबर (हिं.स.) : विवाहानंतर सातत्याने पैशासाठी छळ, मारहाण तसेच पतीकडून सुन्नत पद्धतीने ‘तोंडी व लिखित तलाक’ दिल्याच्या प्रकरणी एका महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासरे आणि सासू अशा तिघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचा विवाह २४ जानेवारी २०२२ रोजी झाला. त्यानंतर पती, सासू व सासरे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्यास भाग पाडत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. तिच्या लग्नातील आठ तोळे सोन्याचे दागिने आरोपींकडेच ठेवून घेतल्याचेही सांगितले. पतीने तिला ‘सुन्नत पद्धतीने तलाक देत आहे’ असा मजकूर असलेले पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात कूरियरने पाठविले. त्या पत्रात तीन हयातीनुसार सलग तीन तलाक दिल्याचे नमूद केले आहे. संबंधित पत्र महिला सुरक्षा विशेष शाखेत सादर केल्यानंतर तिने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईनाका पोलीस ठाण्यात आरोपींपैकी तिघांविरोधात अधिकृत तक्रार दिली. असून पुढील तपास वपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि एम. एल. शेख करीत आहेत —————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
