cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > जबलपूरमध्ये होणार संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक
National

जबलपूरमध्ये होणार संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक

CliQ INDIA
Last updated: September 23, 2025 6:40 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

-आगामी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणार आयोजन

– संघ कार्यांची समीक्षा व शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांवर चर्चा

नागपूर, 22 सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक 30,31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर दरम्यान मध्यप्रदेशातील जबलपूर येथे आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संघाच्या कार्यांची सखोल समीक्षा केली जाणार आहे, तसेच शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांना अधिक गती कशी द्यावी यावर चर्चा केली जाईल अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.

संघाने आपल्या स्थापनेच्या शंभराव्या वर्षानिमित्त एक विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात हिंदू संमेलने तसेच जनसंवाद कार्यक्रमांचा समावेश केला आहे. या बैठकीत या कार्यक्रमांना अधिक गती देण्यावर निर्णायक चर्चा होईल. विशेषतः अनुसूचित जाती व जनजाती समुदायांना समरसता अभियानाच्या माध्यमातून संघाशी जोडण्याच्या धोरणावर चर्चा होईल.

बैठकीतील प्रमुख मुद्दे:

1. कार्यक्रमांची समीक्षा – शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांचा विस्तार आणि संचालनाची रूपरेषा.

2. समरसता अभियान – अनुसूचित जाती व जनजाती समुदायांना संघाशी जोडण्याच्या धोरणांची तयारी.

3. संघाची संघटनात्मक स्थिती – संघ शाखांच्या विस्तारावर आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदलावरील विचार.

संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील संघाची संघटनात्मक स्थिती खूप मजबूत आहे, विशेषतः जबलपूर येथील महाकौशल प्रांतात विविध सेवा व प्रचार कार्य सुरू आहेत. या बैठकीत जबलपूरकडून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळेल.

प्रतिनिधी सभा व कार्यकारी मंडळाची बैठक:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन प्रमुख बैठका होतात – एक प्रतिनिधी सभा (जी मार्चमध्ये नागपूरमध्ये आयोजित केली जाते) आणि दुसरी अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक. कार्यकारी मंडळाची बैठक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आयोजित केली जाते. मागील वर्षी ही बैठक मथुरा येथे झाली होती. ही बैठक ‘दिवाळी बैठक’ म्हणूनही ओळखली जाते, कारण ती दिवाळी आणि दसऱ्याच्या आसपास आयोजित केली जाते. संघाचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले की या बैठकीत शाखा विस्तारावर चर्चा होईल आणि काही प्रचारकांच्या दायित्वांमध्ये बदल देखील होऊ शकतात.

शाखा विस्तार:

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख, सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संघाच्या शाखांचा वेगाने विस्तार होत आहे. शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांच्या तयारीच्या निमित्ताने मागील तीन वर्षांत बस्ती आणि मंडल स्तरावर शाखांचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या देशभरात संघाच्या 83 हजार शाखा आणि 32 हजार साप्ताहिक मिलन केंद्रे कार्यरत आहेत.

बैठकीत हे प्रमुख प्रतिनिधी असतील:

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सरकार्यवाह, सह सरकार्यवाह, प्रचारक

अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य

45 प्रांत व 11 क्षेत्रांतील संघचालक

भाजपाचे संघटन मंत्री सहित 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी

ही बैठक संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती जबलपूरहून महत्त्वाचा संदेश देईल.

——————————

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

You Might Also Like

नेपाळ एव्हरेस्ट विमा घोटाळा उघडकीस: शेर्पा आणि एजन्सींनी रचला बहु-कोटींचा डाव, पर्यटकांना हेतुपुरस्सर आजारी पाडल्याचा आरोप
राष्ट्रपतींनी ड्युरंड चषक स्पर्धेच्या चषकांचे केले अनावरण | BulletsIn
देशासाठी सतत काहीतरी नवीन करण्याची उर्जा कायम ठेवा – पंतप्रधान | BulletsIn
कॉर्पोरेट कायदे (दुरुस्ती) विधेयक २०२६: केंद्र सरकारकडून व्यवसाय सुलभतेसाठी अनुपालन सोपे, गुन्हेगारीकरण रद्द
प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे मध्य रेल्वेने विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या ‘बॉडीगार्ड’ला कॅनडामध्ये अटक
Next Article आयसीसी आणि बीसीसीआयकडून जय शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?