लंडन, ११ सप्टेंबर (हिं.स.) सोफिया गार्डन्स येथे सराव करताना दुखापत झालेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबात माहिती दिली आहे.
सराव सत्रादरम्यान एनगिडीला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. स्कॅननंतर त्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. ज्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. आता दुखापतग्रस्त झाल्याने त्याला मायदेशी परतावे लागणार आहे. नांद्रे बर्गरला त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.
आफ्रिकन संघ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा १४ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमधील दुसरा सामना शुक्रवारी १२ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. शेवटचा सामना रविवारी ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
